Ambernath: माजी नगरसेवकाच्या मुलाकडून गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला, रस्त्यावर रक्ताचे पाट; अंबरनाथमध्ये रक्तरंजित थरार

Knife Attack on Criminal: गनी रफिक शेख या सराईत गुन्हेगारावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, त्याच्यावर तब्बल ६ वेळा चाकूने वार करण्यात आले आहेत.
 Crime
Crimesamm tv
Published On

अंबरनाथ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका या सराईत गुन्हेगारावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, त्याच्यावर तब्बल ६ वेळा चाकूने वार करण्यात आले आहेत. शिवाय त्याला लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ७ ते ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपींपैकी ऋतिक महाडिक हा माजी नगरसेवक रोहित महाडिक यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

गनी रफिक शेख या सराईत गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी बी. केबिन रोडवरील व्यावसायिक राजू महाडिक आणि त्यांच्या मुलगा रोहित महाडिक यांच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी तलवारीने हल्ला केला होता. त्या प्रकरणी काही आरोपींना अटकही झाली होती. मात्र त्या हल्ल्यामागे गनी शेखचा हात असावा, असा संशय महाडिक कुटुंबाला होता, अशी चर्चा होती.

 Crime
Ladki Bahin Yojana: मे महिना संपला, पैसे कधी मिळणार? लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरेंची मोठी माहिती

३ जून रोजी राहुलनगर परिसरात गनी शेख आपल्या मित्रांसोबत बसलेला असताना, ऋतिक महाडिक, पवन सिंग, भारत म्हेत्रे, शिखरे, अभय कुमार, प्रतीक कन्नड, अर्जुन आणि अन्य काही जणांनी एकत्र येऊन त्याच्यावर चाकूने हल्ला केला. गनीच्या बरगड्यांजवळ आणि पाठीवर सहा वेळा वार करण्यात आले. हल्ला झाल्यानंतर त्याला तातडीने रूग्णलयात नेण्यात आले.

या प्रकरणानंतर त्याने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच घडलेल्या घटनेची माहिती देत त्याने तक्रार दाखल केली आणि आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही केली. दुसरीकडे, रोहित महाडिक यांनी गनी शेखचे सर्व आरोप फेटाळून लावले असून, “आमचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही,” असे स्पष्ट केले आहे.

 Crime
Neelam Gorhe: रूपाली चाकणकर नाही तर, नीलम गोऱ्हेंच्या नेतृत्वाखाली महिला आयोगाची बैठक, पण मराठवाडा अन् विदर्भातील सदस्य नाराज, कारण काय?

शिवाजीनगर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

डीसीपी सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गनी शेख हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर पूर्वी तडीपारीची कारवाईही करण्यात आली होती. या हल्ल्यामागे कुणाचा हात असल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com