Ladki Bahin Yojana: मे महिना संपला, पैसे कधी मिळणार? लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरेंची मोठी माहिती

Ladki Bahin Yojana Installment Update: मे महिना संपला, अद्याप लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे काही जमा झाले नाही. मे महिन्याच्या हप्त्याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Ladki Bahin Yojana
ladki bahincanva
Published On

महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळवून देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या विविध कारणांमुळे विरोधकांच्या निशाण्यावर आहे. हप्त्यांचे वितरण उशिरा होत असल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. अनेकदा ही योजना बंद होणार असल्याचंही विरोधकांनी सांगितलं. अशातच मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याच्या प्रतिक्षेत लाडक्या बहिणी आहेत. मे महिना संपला, अद्याप लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे काही जमा झाले नाही. मे महिन्याच्या हप्त्याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी सांगितलं की, 'सरकारी काम करणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती जानेवारी महिन्यातच मिळाली होती. तेव्हाच पैसे थकवले होते. या योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहे. आज लाडक्या बहिणींना आश्वासन देते की, ही योजना बंद होणार नाही', असं त्यांनी स्पष्ट केलं.

Ladki Bahin Yojana
Leader Viral: कारमध्ये नेत्याचा खुल्लाम खुल्ला रोमान्स, एकानं रंगेहाथ पकडलं अन् व्हिडिओ व्हायरल केला; महिला पॅन्ट घालत असताना..

तसेच मे महिन्याच्या हप्त्याबाबतही त्यांनी मोठी माहिती दिली आहे. 'लवकरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाईल. जसा एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला. तसेच मे महिन्याचा हप्ताही काही दिवसांत वितरीत केला जाईल, असं आदिती तटकरेंनी सांगितलं.

Ladki Bahin Yojana
Neelam Gorhe: रूपाली चाकणकर नाही तर, नीलम गोऱ्हेंच्या नेतृत्वाखाली महिला आयोगाची बैठक, पण मराठवाडा अन् विदर्भातील सदस्य नाराज, कारण काय?

अजित पवारांनी चूक झाल्याचं केलं स्पष्ट

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरवापर काही राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी केल्याचे उघडकीस आले आहे. हजारो अपात्र महिलांनी या योजनेचे पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये चूक झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com