Chandrapur Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: वडील की हैवान!, वर्षभर पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, असा झाला घटनेचा उलगडा

Pune Girl Physically Assaulted By Father: वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी आरोपी वडिलाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. वडिलांनीच आपल्या ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गेल्या वर्षभरापासून आरोपी आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. शाळेतील गुड टच बॅड टच उपक्रमातून ही गंभीर घटना उघडकीस आली. शिक्षकांनी दिलेल्या तक्रारीनंतर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यामध्ये आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वारजेमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहते. ही मुलगी सहावीमध्ये शिकत असून ती ११ वर्षांची आहे. या मुलीवर तिच्याच वडिलांनी राहत्या घरी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. मोबाइलमध्ये अश्लिल व्हिडीओ दाखवत बापाने आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. गेल्या वर्षभरापासून आरोपीकडून हे लैंगिक अत्याचार सुरू होते. पंकज देवेंद्र ठाकूर (३५ वर्षे) असं अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो मुळचा बिहारचा राहणारा आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ देखील आढळले असल्याची माहिती पुणे पोलीसांकडून देण्यात आली आहे..

पीडित मुलगी शिकत असलेल्या शाळेमध्ये गुड टच बॅट टच उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमादरम्यान पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार शिक्षिकेला सांगितला. त्यावेळी शिक्षिकेला देखील मोठा धक्का बसला. यानंतर शाळेच्या शिक्षकांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अवघ्या काही तासांत अटक केली. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

ZP School : जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला; १३ विद्यार्थी गंभीर, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT