सागर आव्हाड, साम टीव्ही
पुणे : पुण्यातील दौंड तालुक्यात भीषण अपघाताची भयंकर घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील खामगावमध्ये एका कंपनीच्या पार्किंगमघ्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन ट्रकमध्ये चिरडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण अपघाताचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील दौंडमधील अनमोल अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या पार्किंगमध्ये दोन ट्रकमध्ये चिरडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ट्रक मागे घेताना तिघांपैकी एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.
दौंड तालुक्यातील खामगाव गावच्या हद्दीतील कुलमळा परिसरातील या कंपनीत दोन ट्रकच्या मध्यभागी चिरडून एका कामगाराचा जागीच मृत्यू झालाय. मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
कंपनीत ट्रक पाठीमागे घेत होता. यावेळी त्या ठिकाणावरून ३ कर्मचारी पायी चालत निघाले होते. त्याचवेळी बाजूला उभा असलेला दुसऱ्या चालकाने ट्रक पाठीमागे घेतला. यावेळी या तिघांमध्ये पुढच्या बाजूला असलेला कर्मचारी हा या दोन्ही ट्रकच्या मध्ये अडकला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत यवत पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही सुरु आहे.
बीडच्या केज शहरात भरधाव बसच्या चाकाखाली आल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे बीडमधील या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. केज येथील किशोर शेटे हे दुचाकीवरून केज- कळंब रोडने त्यांच्या शेताकडे जात होते. यादरम्यान दुसरा एक दुचाकीस्वार मोबाईलवर बोलत होता. त्याची मोटरसायकल किशोर शेटे यांच्या दुचाकीस्वाराला धडकल्याने शेटे बाजूने जाणाऱ्या बसच्या चाकाखाली आले. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.