Pune Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरले! समलिंगी संबंधाला विरोध केला, १२ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या

Pune School Student Killed: पुण्यातील शिरूरमध्ये शाळकरी मुलाची हत्या करण्यात आली. विहिरीजवळ अर्धनग्न अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. समलिंगी संबंधाला विरोध केल्याने या मुलाची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Priya More

Summary -

  • पुण्यातील शिरूरमध्ये १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

  • विहिरीजवळ संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

  • पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं

  • घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण

रोहिदास गाडगे, शिरूर

पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये १२ वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. दहिवडीमध्ये १२ वर्षीय मुलाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. समलिंगी संबंधाला विरोधात केल्यामुळे या मुलीची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे शिरूरमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील दहिवडी गावात ही धक्कादायक घटना घडली. साईराज मांजरे या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. साईराज सहावीत शिकत होता. घराजवळील विहिरीजवळ अर्धनग्न अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला.

या धक्कादायक घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला. साईराजच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासादरम्यान शिक्रापूर पोलिसांनी त्याच्या भावकीतील एका तरुणाला संशयित म्हणून ताब्यात घेतले. समलिंगी संबंधाला विरोध केल्याच्या कारणातून साईराजची हत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

१० वर्षांपूर्वी याच ठिकाणी एका लहान मुलाची हत्या झाली होती. त्या देखील हत्या प्रकरणाच्या संबंधाबाबत चौकशी केली जाणार आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र बसून विचारमंथन करायला हवे - माजी मंत्री वसंतराव पुरके

PWD Scam: कार्यकारी अभियंत्यासह ३ जणांना अटक, सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ

Silent Health Warning: सकाळी उठताच थकवा आणि पोट फुगल्यासारखे वाटतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार

Worst Drinks for Kidney: किडनीला आतून पोखरतात हे 5 ड्रिंक्स; चवीच्या नादात आरोग्याचं नुकसान करू नका

Moong vs Chana Sprouts: मूग की चणा स्प्राउट्स, वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे?

SCROLL FOR NEXT