CNG Price Rises in Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Pune CNG Price Hike: महागाईचा भडका! पुण्यात CNG गॅसच्या दरात वाढ, आता किती रुपये द्यावे लागणार?

CNG Price Rises in Pune: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणेकरांचा प्रवास महागणार असून त्यांच्या खिशावर ताण येणार आहे. कारण पुण्यात सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. पुण्यात एक किली सीएनजीच्या दरात ०.७५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

सीएनजी वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. पेट्रोल-डिझेल पाठोपाठ सीएनजी गॅसच्या दरात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास देखील महागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. ७५ पैशाने सीएनजीचे दर वाढले आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) यांच्याकडून पुणे शहर, पिंपरी- चिंचवड, तसेच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागांमध्ये सीएनजीच्या दरात किरकोळ वाढ करण्यात आली आहे.

पुण्यात सीएनजीचे दर वाढल्यामुळे पुणेकरांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. नवीन सीएनजीच्या दरांनुसार सीएनजीचा किरकोळ दर प्रतिकिलो ८९ रुपयांवरून ८९.७५ रुपये करण्यात आला आहे. म्हणजेच पुणेकरांना एक किलो सीएनजीसाठी ०.७५ रुपये अधिकचे मोजावे लागणार आहे. ही दरवाढ ८ एप्रिल आणि ९ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, जून २०२४ नंतर पहिल्यांदा सीएनजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आयजीएलचा एकूण सीएनजी विक्रीत ७० टक्के भाग आहे. तर इतर कंपन्यांचा ३० टक्के भाग आहे. सीएनजी गॅसच्या दरात वाढ केल्याने दिल्लीत सीएनजीचा दर प्रति किलोग्रॅम ७६.०९ रुपयांवर पोहोचला आहे. तर नोव्हेंबर २०२४ मध्ये आईजीएलने दिल्लीव्यतिरिक्त इतर शहरांमधील सीएनजीच्या किंमतीत वाढ केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT