
पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हे रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अशामध्ये आता या रुग्णालयाला पुणे महानगर पालिकेने दणका दिला आहे. पालिकेकडून या रुग्णालयाला नोटीस पाठवण्यात आली आहे. मिळकतकर वसुलीसाठी ही नोटीस बजावण्यात आली होती.
पुणे महानगर पालिकेने अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मिळकतकर वसुलीसाठी नोटीस बजावली आहे. साम टिव्हीने सर्वप्रथम मंगेशकर रुग्णालयाने २७ कोटी रुपयांचा मिळकत कर थकवल्याची बातमी दिली होती. या बातमीनंतर पालिकेला जाग आली. महापालिकेने लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या नावाने नोटीस बजावली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे २०१४ पासूनची मिळकतकराची थकबाकी आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची २२ कोटी ६ लाख ७६ हजार रुपयेची थकबाकी देणे बाकी आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही थकबाकी भरणे आवश्यक आहे. २ दिवसांत २२ कोटीची थकबाकी न भरसल्या पुढील कारवाई करण्याची नोटीसमध्ये नमूद केले आहे.
थकबाकी न भरल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कराधान नियम ४२ मध्ये तरतुदीनुसार रुग्णालयावर जप्तीची कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांनी तोंडी आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या रुग्णालयाला २ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे त्यानुसार त्यांना थकीत मिळकतकर भरणे बंधनकारक नाही. जर मिळकतकर भरला नाही तर या रुग्णालयावर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.