Pune News: तनिषा भिसे प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून तपास पूर्ण; महापालिकाही ॲक्शन मोडवर, खासगी रूग्णालयांना पाठवली नोटीस

Deenanath Mangeshkar Hospital Faces Tax Notice and Regulatory Action: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अडचणीत; कर थकबाकी आणि उपचारप्रक्रियेवरून वाद.
Deenanath Mangeshkar Hospital Tanisha Bhise death case
Deenanath Mangeshkar Hospital Tanisha Bhise death caseSaam Tv News
Published On

पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालय सध्या तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणानंतर अडचणीत सापडले आहे. आता या रूग्णालयाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाची मिळकत कर थकबाकी, तर दुसरीकडे तातडीच्या उपचारांपूर्वी अनामत रक्कम घेण्याच्या प्रथेविरोधात महापालिकेने उचलले पाऊल. तसेच या प्रकरणात पुणे पोलिसांकडून पूर्ण झालेला तपास. आता या रूग्णालयाबाबतीत कोणत्या नव्या बाबी समोर येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या तिन्ही घडामोडी सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

मंगेशकर रूग्णालयाला महापालिकेची मिळकत कराची नोटीस

पुणे महापालिकेच्या म्हणण्यानुसार, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर २२ कोटी रूपयांची मिळकत कराची थकबाकी आहे. २२ कोटी रुपयांची थकबाकी भरण्यासाठी महापालिकेकडून रुग्णालयास नोटीस बजावण्यात येणार आहे.

धर्मादाय कायद्यानुसार मिळकत करामध्ये सवलत द्यावी, या मागणीसाठी रूग्णालय प्रशासन २०१७ मध्ये न्यायालयात गेले होते. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, तसेच न्यायालयाने कर वसुलीला स्थगिती देखील दिलेली नाही. त्यामुळे आता महापालिकेकडून रूग्णालयाला अधिकृत नोटीस देण्याचे निश्चत करण्यात आले आहे.

Deenanath Mangeshkar Hospital Tanisha Bhise death case
Nanded: दारु ढोसून आई अन् बायकोला मारहाण; आईनेच पोराच्या डोक्यात केले वार, घरातच रक्ताचा पाट

तातडीच्या उपचारांपूर्वी डिपॉझिट घेण्यावर महापालिकेचे बंधन

गरजू रूग्णांवर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे, यावर भर देत पुणे महापालिकेने शहरातील सर्व खासगी रूग्णालयांना नोटीस पाठवली आहे. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये. तसेच रुग्णावर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्यावे, असेही महापालिकेने रुग्णालयांना पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद केलं आहे. त्यामुळे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे.

Deenanath Mangeshkar Hospital Tanisha Bhise death case
Petrol-Diesel Price: नव्या आर्थिक वर्षातच सरकारनं दिला महागाईचा दणका; पेट्रोल- डिझेल महाग होणार, दर कधीपासून वाढणार?

तनिषा भिसे प्रकरणात चौकशी पूर्ण

पुणे पोलिसांकडून तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. तसेच संबंधित सर्वांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि रूग्णालयाच्या नोंदीचाही तपास करण्यात आला आहे. चौकशी अहवाल आज किंवा उद्या ससून रूग्णालयाच्या अधीक्षकांकडे सुपूर्त केला जाणार आहे. त्यानंतर मेडिकल कमिटी या प्रकरणावर अंतिम निर्णय घेणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com