Pune News: दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; गर्भवती महिला तब्बल साडेपाच तास रूग्णालयातच होती पण..

Pune Hospital Embroiled in Controversy Over Pregnant Womans Death: गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात. याप्रकरणी पुणे पोलिस, तसेच राज्य आरोग्य विभागाच्या समितीने वेगाने तपास सुरू.
Dinanath Mangeshkar Hospital Pune
Dinanath Mangeshkar Hospital PuneSaam Tv
Published On

पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालय सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रूग्णालयातील प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या संतापजनक घटनेनंतर सर्वच स्थरातून रोष व्यक्त केला जात आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी पुणे पोलीस सध्या अॅक्शन मोडवर आहेत. या प्रकरणी पुणे पोलीस, तसेच राज्य आरोग्य विभागाच्या समितीने वेगाने तपास सुरू केला आहे. पुणे पोलिसांना रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, या सीसीटीव्ही फुटेजमधून अनेक बाबी समोर आल्या आहेत.

पोलिसांचा तपास सुरू

पुणे पोलीस तसेच राज्य आरोग्य विभागाच्या समितीने वेगाने तपास करायला सुरूवात केली आहे. पुणे पोलिसांनी रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, प्राथमिक तपासात तनिषा भिसे या सुमारे साडे पाच तास दीनानाथ रूग्णालयात उपस्थित असल्याचे आढळून आले आहे. मात्र, त्यांच्यावर कोणतेही उपचार करण्यात आल्याचे पुरावे नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी थेट कारवाई न करता, ससून रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

Dinanath Mangeshkar Hospital Pune
Kolhapur: नोकरी अन् पैशांच्या हव्यासापोटी भोंदूबाबाकडे गेली, अन् नको ते घडलं...; मंत्रोच्चार करून तरुणीवर...

या पत्राद्वारे, दीनानाथ रूग्णालयात नेमकं काय घडलं याची चौकशी करून अहवाल सादर करण्याची विनंती करण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयाने रुग्णाच्या कुटुंबीयांकडून अनामत रक्कम ठेवण्याची मागणी केली होती का? याचाही तपास पोलीस करणार आहेत.

आरोग्य विभागाची समिती तपासात सक्रिय

भिसे प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती नेमली आहे. रविवारी समितीने तनिषा भिसे यांच्या घरी भेट देऊन नातेवाईकांचे जबाब नोंदवले. तनिषा भिसे यांना रूग्णालयात नेण्यात आल्यानंतर नेमके काय घडले? याची माहितीही कुटुंबाकडून घेण्यात आली. प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठवण्यात आला असून, अंतिम अहवाल लवकरच सादर होणार आहे.

Dinanath Mangeshkar Hospital Pune
Summer: उन्हाळ्यात दिवसाला किती लिटर पाणी प्यावं?

मातृत्वाचे स्वप्न भंग

"रुग्णाला उपचार देण्यासाठी रुग्णालयाने टाळाटाळ केली. प्रत्येक मातृत्वाचे स्वप्न असतं ते आज भंग पावले. घडलेली संपूर्ण घटना भिसे कुटुंबाने सांगितला आहे. रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासनाची माहिती ही गोपनीय असते. पण रुग्णालयाने ते समोर आणले. रुग्णालयाला कडक शब्दात समज दिला जाणार आहे. राज्याच्या वतीने जी समिती नेमली आहे, त्याचा अहवाल पोलिस आयुक्तालयात सादर केला जाणार आहे. पोलिसांसमोर जो काही जबाब नोंदवला गेला आहे, त्यावर सुद्धा चर्चा केली जाणार आहे", असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाले आहेत.

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर २७ कोटींचा थकीत प्रॉपर्टी टॅक्स

प्रॉपर्टी टॅक्स थकवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, याकरिता पुणे महानगरपालिका उप आयुक्त (मिळकत कर विभाग) यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गेल्या ६ वर्षांपासून तब्बल २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स भरला नसल्याचं समोर आलंय. २०१९पासून रुग्णालयाचा टॅक्स थकीत आहे.

सामान्य नागरिकांनी प्रॉपर्टी टॅक्स थकवला तर पुणे महानगरपालिकाकडून दंडात्मक आणि जप्तीची कारवाई केली जाते. मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर मेहरबानीची भूमिका महापालिकेने घेतल्याचे दिसत आहे. त्या विरोधात युवक काँग्रेस महापालिकेला निवेदन देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com