
अक्षय बडवे, साम टीव्ही
पुणे : पुण्यात फसवणूक, हत्या, बलात्कार या घटना काही नवीन नाही. मात्र, आता जे पुण्यात घडलंय त्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. कॉलेजमध्ये प्रवेशासाठी चक्क खोटी जाहिरात करुन काही दलालांनी विद्यार्थ्यांची फसवणूक लावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजच्या व्यवस्थापनातील एकजण युट्युब बघत असताना त्याला एका चॅनलवर सिम्बॉयसिस कॉलेजचा लोगो असलेल्या संस्थेच्या इमारतीचा फोटो दिसला. त्यावर सिम्बॉयसिसमध्ये MBA ॲडमिशनसाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश हवा असल्यास किंवा ज्यांचा बजेट आहे, अशांनी दिलेल्या क्रमांकावर साधावा, अशी खोटी जाहिरात दिसून आली. संबंधिताने तात्काळ ही बाब महाविद्यालयाच्या वरिष्ठांना सांगितली आणि तात्काळ डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
संस्थेनं प्रकरण जाणून घेण्यासाठी त्या जाहिरातीत दिलेल्या नंबरवर संपर्क साधला असता यातील एका आरोपीने त्यांना नोयडामध्ये असल्याचं सांगितलं. तसेच ॲडमिशनसाठी तुम्ही पुण्यातील बाणेर भागात असलेल्या त्यांच्या ऑफिसला जायला सांगितलं. त्या ऑफिसवर गेल्यावर यातील दुसऱ्या आरोपीने सुरुवातीला ५ लाख रुपये आणि मुळ कागदपत्रे द्यावी लागतील. आम्ही तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये टाकून देऊ. जर तुम्ही उशीर केला तर, डोनेशनचे पैसे वाढत जातील' असं सांगितलं.
'सुरुवातीला ५ लाख रुपये द्यावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला महिन्याभरात कॉलेजमधून एक मेल येईल. त्याठिकाणी जाऊन तुम्ही रितसर ॲडमिशन फी भरुन ॲडमिशन घ्या, असं सांगितलं. त्यानंतर उर्वरित १५ लाख रुपये माझ्याकडे येऊन भरल्यानंतर तुमचे मुळ कागदपत्रे तुम्हाला परत मिळतील. १५ लाख रुपये दिले नाही तर तुम्हाला कागदपत्रे मिळणार नाहीत. तसंच तुमचे ॲडमिशन रद्द करण्यात येईल', असं सांगण्यात आलं. 'तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे तर आम्हाला पैसे देण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही', अशी सांगण्यात आलं.
दरम्यान, 'आमच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आम्ही कुठल्याही युट्युब किंवा सोशल मीडियावर जाहिरात करत नाहीत. महाविद्यालयाचे नाव वापरून ही फसवणूक केल्याचा प्रकार आम्ही पोलिसांत कळवला आहे. आमच्या प्रवेशाची प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे असते. तसेच आम्ही कुठल्याही एजंट किंवा कन्सल्टन्सी यांना नियुक्त केलेलं नाही. त्यामुळे सिम्बॉयसिसमध्ये ॲडमिशन घेण्याची जाहिरात तुम्हाला सोशल मीडियावर दिसली तर त्याला बळी पडू नका', असं आवाहन सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे संचालक डॉ. श्रीरंग आलटेकर यांनी केलं आहे.
आरोपींच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१९, ३३६(३), ३४०(१), ३४०(२), ६१, ६१, ६६ (ड) या अन्वये गुन्हा दाखल केला असून संबंधित प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.