MNS News: "तर, भैय्यांना मुंबईत राहू द्यायचं की नाही..." राज ठाकरेंच्या मनसेचा भाजपला इशारा

Political Firestorm in Maharashtra After Petition Targets MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेनेचे प्रमुख सुनील शुक्ला यांनी केली होती. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तिखट समाचार घेतला.
MNS
MNSSaam
Published On

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी केली. शुक्ला यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली. तसेच कारवाईची देखील मागणी केली आहे. त्यांनी केलेल्या याचिकेमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. "मनसेची मान्यता राहणार की जाणार हे भैय्ये ठरवणार का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

संदीप देशपांडे कडाडले

"मनसे पक्षाची मान्यता राहावी की नाही, हे आता भैय्ये ठरवणार का? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी, यासाठी जर भैय्ये प्रयत्न करणार असतील, तर भैय्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही, याचा विचार आम्हालाही करावं लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

MNS
Saudi Arabia: सौदी अरेबियाचा भारतासह १४ देशांना दणका! व्हिसावर घातली बंदी, कारण काय?

"प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. हे त्यांचीच पिट्टू आहेत. त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी षडयंत्र रचत असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला आहे. अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही. जर आम्हाला कुणी संपवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पण त्यांना इथे ठेवायचं की नाही, याचा विचार करू", असं देशपांडे म्हणाले.

MNS
Yavatmal News: धक्कादायक! सरपंचाकडून घटस्फोटीत महिलेवर लैंगिक अत्याचार, लग्नाचं आमिष दाखवून ५ वर्ष शारीरिक संबंध

सुनील शुक्ला नेमकं काय म्हणाले?

"राज ठाकरे तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलाय, असं वाटत आहे. मनसे पक्षातील ज्या कार्यकर्त्यांनी ज्या बँकेत जाऊन तेथील बँकेंच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केलीय. ते कर्मचारी देखील हिंदू आहेत. तुम्ही हिंदूविरोधी आहात. राज ठाकरे तुम्ही फक्त उत्तर भारतीय नव्हे तर, मराठी लोकांचेही विरोधत आहात. याच कारणामुळे मी तुमच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे तुम्ही संविधानाचं उल्लंघन करू शकत नाही, हिंदूंना मारू शकत नाही", असं शुक्ला म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com