
रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव ठाकरे (शिवसेना) पक्षाला गेल्या काही महिन्यात गळती लागली आहे. अनेक बडे नेते एकनाथ शिंदेंची शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यानंतर आता ठाकरे गटाला कोकणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण २०१९ मध्ये गुहागर विधानसभा निवडणूक लढवलेल्या सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटात घरवापसी केली आहे. ते ठाकरेंच्या सोबत येत असल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सहदेव बेटकर यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना सोडून ते काही काळापूर्वी काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा ठाकरेंचं शिवबंधन बांधलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील तडफदार नेते अशी ओळख असलेले सहदेव बेटकरांनी आता ठाकरेंचा झेंडा हाती घेतला आहे . आज ८ एप्रिल २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या समर्थकांच्या समवेत त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
बेटकर यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ५२ हजार मतं मिळवली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सहदेव बेटकरांचा येथील गावांशी, वाड्यांशी, कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क होता. २०१९ च्या निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार होते. निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद सदस्य, सभापती म्हणून ते सक्रीय होते. पण पराभूत झाल्यानंतर सहदेव बेटकर जास्त सक्रीय नव्हते.
२०१४ आणि २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती. सहदेव बेटकर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर गुहागरमध्ये फारसे दिसले नाहीत. बेटकर यांनी २०१९ साली विधानसभा निवडणुकीत ५२ हजार मतं मिळवली होती. सहदेव बेटकर यांना सक्रिय करुन उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांना शह देण्याची तयारी शिवसेनेने केल्याची चर्चा होती. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांना संधी मिळाली नाही. ते गेले काही दिवस नाराज असल्याच्या देखील चर्चा होत्या. आता त्यांनी ठाकरे करून प्रवेश करून सक्रिय होण्याचं निश्चित केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.