Pune Accident  Saam TV News
मुंबई/पुणे

Pune Accident : ओव्हरटेक करताना अनर्थ घडला, ट्रकने दोघांना फरपटत नेलं; पुण्यात दोन तरुणांना चिरडलं

Pune Chakan Accident : पुण्यातील चाकण येथील वासुलीफाटा रोडवर बिरदवडी येथे भरधाव वेगात आलेल्या ट्रकने ओव्हरटेक करताना दुचाकीला जोरदार धडक देत दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडलीय.

Prashant Patil

रोहिदास गाडगे, साम टिव्ही

पुणे : पुण्यातील चाकण येथील वासुलीफाटा रोडवर बिरदवडी येथे भरधाव वेगात आलेल्या ट्रकने ओव्हरटेक करताना दुचाकीला जोरदार धडक देत दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडलीय. या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली आलेले दोघे तरुण जवळपास १५ ते २० फूट फरफटत नेल्याचा थरार स्थानिक नागरिकांनी सांगितला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी अपघाताची दखल घेऊन घटनास्थळी पंचनामा केलाय. सुजय कडूसकर आणि सोहम कडूसकर असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत.

वांगणी-बदलापूर महामार्गावर विचित्र अपघात

दरम्यान, वांगणी-बदलापूर मुख्य हायवेवर आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. पावसामुळे इथला डांबरी रस्ता निसरडा झाल्यामुळे तीन वाहनं उलटली. यात दोन मालवाहू पिकअप आणि एका स्कूटरचा अपघात झाला. या अपघातात दोन वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत. पावसाळ्यात हा रस्ता वाहन धारकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

कल्याण-कर्जत राज्य महामार्गावरील वांगणी-बदलापूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. काही ठिकाणी या रस्त्याला ठेकेदाराने डांबरी पॅच मारले आहेत. मात्र हे पॅच मारताना पुरेशी काळजी न घेतली गेल्यामुळे पावसामुळे रस्ता निसरडा बनला आहे. अवकाळी पावसामुळे हा रस्ता वाहन धारकांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. दरम्यान, आज सकाळी याच ठिकाणी अपघात झाला आहे.

पावसामुळे धोकेदायक झालेल्या या रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास वांगणीतील गणेश घाटाजवळ दोन मालवाहू पिकअप आणि एक स्कूटर घसरली. अपघात इतका भीषण होता की, तीनही वाहनांनी पलटी मारली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचालक आणि स्कूटरचालक गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतीचा हात दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT