
Nilesh Chavan Arrest : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात फरार आरोपी निलेश चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच चव्हाण फरार झाला होता. त्याला नेपाळहून अटक करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक चार, गुंडा विरोधी पथक आणि सायबर क्राईक ब्रांचने मिळून संयुक्तपणे निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवरुन ताब्यात घेण्यात आले आहे.
पुण्याहून पुढे कर्जत त्यानंतर मुंबई, दिल्ली, गोरखपूर, सोनवली (उत्तर प्रदेश), बहिरवा (नेपाळ), काठमांडू, परत बहिरवा (नेपाळ), आणि परत सोनवली असा प्रवास निलेश चव्हाणने फरार असताना केला होता. दुपारी तीनच्या सुमारास निलेश चव्हाणच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मध्यरात्री दोन वाजता निलेश चव्हाण विमानाने पुण्यात येणार आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाण मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे विमानतळावर येईल. त्यानंतर उद्या (३१ मे) दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. निलेश चव्हाणवर पुण्यातील बावधन आणि वारजे या दोन पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निलेश चव्हाणच्या अटकेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
मागील दहा ते बारा दिवसांपासून निलेश चव्हाण फरार होता. त्याला पकडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी पाच पथक नेमली होती. वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणचे नाव समोर आले होते. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाळ निलेश चव्हाणकडे होते. त्या लहान बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उद्या या प्रकरणीवर सुनावणी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.