Pune Indrayani River News:  Saam TV
मुंबई/पुणे

Indrayani River: इंद्रायणी पुन्हा फेसाळली! CM शिंदेंनी पाहणी करत दिलं होतं आश्वासन; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा फोल

Pune Indrayani River News: गेल्या काही दिवसांपासून पवित्र इंद्रायणी नदी फेसाळत असल्याचे समोर येत आहे. द्रायणीच्या नदीत पात्रात सांडपाणी,रसायन मिश्रण पाणी सोडले जात असल्याने नदीपात्र दुर्गंधीयुक्त होत आहे.

Gangappa Pujari, रोहिदास गाडगे

पुणे, ता. २ जूलै २०२४

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाणी केल्यानंतर सलग तिस-या दिवशी रसायन मिश्रित पाणी नदीपात्रात आल्याने इंद्रायणी पुन्हा फेसाळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रदुषण महामंडळाचा दावा पुन्हा एकदा फोल ठरल्याचे दिसत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून पवित्र इंद्रायणी नदी फेसाळत असल्याचे समोर येत आहे. द्रायणीच्या नदीत पात्रात सांडपाणी,रसायन मिश्रण पाणी सोडले जात असल्याने नदीपात्र दुर्गंधीयुक्त होत आहे. याबाबत वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याची गंभीर दखल घेतली होती.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर सलग तिस-या दिवशी रसायन मिश्रित पाणी नदीपात्रात आल्याने इंद्रायणी पुन्हा फेसाळली आहे. त्यामुळे यावर कायमस्वरुपी कधी मार्ग निघणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सध्या आषाढी वारी दिंडी सोहळा सुरू आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहाणी करुन इंद्रायणी प्रदुषण मुक्त करणार असल्याचा संकल्प केला होता. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाच तिस-या दिवशीही केराची टोपली दाखवली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

असिड हल्ल्याने महाराष्ट्र हादरला...? सहावीतल्या चिमुकलीवर अॅसिड हल्ला

Air Cooler: ३ पातींचा की ५ पातींचा कूलर विकत घेणं योग्य? खरेदीआधी वाचा ही माहिती

मुंबई, नाशिक अन् पुण्याला रेल्वेचं मोठं गिफ्ट... वाचा काय काय फायदा होणार?

LPG cylinder gas level: सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक? व्हायरल व्हिडिओत सांगितलेला हा उपाय खरंच काम करतो?

SCROLL FOR NEXT