Maharashtra Politics: ब्रेकिंग! पंकजा मुंडेंची विधानपरिषदेवर वर्णी, सदाभाऊ खोत यांच्यासह ५ नावे जाहीर; VIDEO

Maharashtra Vidhanparishad Election 2024: भारतीय जनता पक्षाकडून विधानपरिषदेच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पंकजा मुंडेंचा समावेश आहे.
Maharashtra Politics: ब्रेकिंग! पंकजा मुंडेंची विधानपरिषदेवर वर्णी; भाजपकडून ५ नावे जाहीर
Maharashtra Vidhanpatishad Election 2024: Saamtv

वैदेही कानेकर| मुंबई, ता. १ जुलै २०२४

लोकसभेनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला मतदान होणार आहे. याबाबत आता सर्वात महत्वाची बातमी समोर आली असून पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. भारतीय जनता पक्षाकडून विधानपरिषदेच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पंकजा मुंडेंचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने पाच नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये बीड लोकसभेच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्यासह रयतक्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके आणि अमित गोरखे यांच्या नावाचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ नावांची यादी दिल्ली हायकमांडकडे पाठवली होती. यामधून पाच नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करा अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर भाजपने हा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Politics: ब्रेकिंग! पंकजा मुंडेंची विधानपरिषदेवर वर्णी; भाजपकडून ५ नावे जाहीर
Maharashtra Politics : लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीचं उदाहरण देत ठाकरे गटाचे अजित पवारांना चिमटे

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पिछेहाट पाहता भारतीय जनता पक्षाने सावध भूमिका घेतली आहे. राज्यात सध्या मराठा- ओबीसी वाद सुरू आहे. अशातच मुंडे यांच्या पराभवामुळे ओबीसी मतदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळेच पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी देत मतांचे विभाजन टाळण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Maharashtra Politics: ब्रेकिंग! पंकजा मुंडेंची विधानपरिषदेवर वर्णी; भाजपकडून ५ नावे जाहीर
Pune Fake Police VIDEO : क्रिकेट चाहत्यांना मारहाण करणाऱ्या तोतया पोलीसाला फरासखाना पोलीसांनकडून अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com