Maharashtra Politics : लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीचं उदाहरण देत ठाकरे गटाचे अजित पवारांना चिमटे

Shiv Sena criticizes Ajit Pawar : "लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्याने?, असे चिमटे अजित पवार यांना सामनाच्या अग्रलेखातून काढण्यात आले.
uddhav thackeray ajit pawar supriya sule
uddhav thackeray ajit pawar supriya suleSaam TV
Published On

सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (२८ जून) महायुती सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी राज्यातील गोरगरीब महिलांसाठी सरकार 'लाडकी बहीण योजना' राबवणार असल्याचं जाहीर केलं. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे मुख्यपत्र सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

uddhav thackeray ajit pawar supriya sule
Weather Forecast : राज्यात पुढील ७२ तास मुसळधार पावसाचे; कोणकोणत्या जिल्ह्यांना झोडपणार पाऊस? वाचा वेदर रिपोर्ट

"मागील अडीच वर्षे राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’चा या सरकारला विसर पडला होता. मात्र लोकसभा निवडणुकीतील दणक्याने त्यांना अचानक ‘बहिणीं’ची उचकी लागली. त्यातूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या नावाने एक योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली", अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली.

"लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्याने?, असे चिमटे देखील अजित पवार यांना सामनाच्या अग्रलेखातून काढण्यात आले. ही योजना आकर्षक असली तरी असंख्य अटी-शर्तींचा गुंता राज्यातील लाखो भगिनी कसा सोडवू शकतील? असा सवालही अजित पवार यांना विचारण्यात आला.

"पुन्हा या लाडक्या बहिणींचे हजारो भाऊ पुण्या-नाशकात ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक शेतकरी भाऊ आजही आत्महत्या करीत असल्याने या भावांसाठी बहिणी आक्रोश करीत आहेत. त्या भावांना तर सरकारने वाऱ्यावरच सोडले आहे. तरीही बहिणींच्या नावाने ही जुमलेबाजी करण्याचे धाडस सत्ताधारी करीत आहेत", असा घणाघात सामना अग्रलेखातून करण्यात आला.

"महागाईचा वणवा तुम्हीच पेटविला आहे. त्यामुळे तुमची ही जेमतेम दीड हजाराची ‘फुंकर’ भगिनींना कितपत दिलासा देईल? हाही प्रश्न आहेच.लोकसभेप्रमाणेच उद्याच्या विधानसभा निवडणुकीतही जनता तुम्हाला सत्तेपासून कायमचे ‘अनाथ’ करणार आहे. अर्थसंकल्पातील योजनांच्या श्रेयाची कितीही वाटमारी करा, तुमची ही ‘सत्तेची वारी’ शेवटचीच आहे", असा टोलाही सामना अग्रलेखातून लगावण्यात आला.

uddhav thackeray ajit pawar supriya sule
LPG Cylinder Price Cut : खुशखबर! गॅस सिलिंडरच्या दरात कपात, जुलैच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com