Shruti Vilas Kadam
शुगर फ्री मोदकासाठी खोबरे, खजूर, काजू-बदाम, वेलची पूड आणि तूप असे साहित्य घ्या. नैसर्गिक गोडव्यासाठी खजुराचा वापर करता येईल.
बिया काढलेले खजूर काही वेळ कोमट पाण्यात भिजवा. मऊ झाल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून खजुराची बारीक पेस्ट तयार करा.
कढईत थोडे तूप घेऊन काजू आणि बदाम हलके भाजून घ्या. ते थंड झाल्यावर बारीक कुटून किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
कढईत थोडे तूप घालून किसलेले खोबरे हलके परतून घ्या. त्यात खजुराची पेस्ट आणि वेलची पूड घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.
या मिश्रणात भाजलेले ड्रायफ्रूट्स घाला. सर्व साहित्य चांगले मिसळून घ्या. मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करून ते थोडे थंड होऊ द्या.
तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून मोदकाच्या साच्यात भरून त्याला सुंदर आकार द्या. साचा नसेल तर हातानेही मोदक तयार करू शकता.
तयार मोदक काही मिनिटे वाफवून किंवा तसाच सेट होऊ द्या. त्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि कुटुंबासोबत या स्वादिष्ट मोदकांचा आस्वाद घ्या.