Shruti Vilas Kadam
भेंडी साठवण्यापूर्वी ती धुणे टाळा. भेंडीवर पाणी राहिल्यास ती लवकर खराब होण्याची आणि चिकट होण्याची शक्यता वाढते.
भेंडीवर ओलावा राहू नये याची काळजी घ्या. भेंडी धुतली असेल तर ती स्वच्छ कापडाने किंवा टिश्यूने पूर्णपणे कोरडी करा.
भेंडी शक्यतो पूर्ण स्वरूपातच फ्रिजमध्ये ठेवा. आधीच कापून ठेवल्यास तिच्यातील चिकटपणा वाढू शकतो आणि ती लवकर खराब होऊ शकते.
भेंडी साठवताना डब्यात किंवा पिशवीत पेपर टॉवेल ठेवल्यास अतिरिक्त ओलावा शोषून घेण्यास मदत होते. त्यामुळे भेंडी जास्त काळ ताजी राहू शकते.
भेंडी पूर्णपणे बंद एअरटाइट डब्यात ठेवल्यास आत ओलावा जमा होऊ शकतो. त्यामुळे हवा खेळती राहील अशा पद्धतीने भेंडी साठवणे चांगले.
भेंडी फ्रिजच्या भाजीपाला ठेवण्याच्या भागात ठेवावी. तापमानातील अति बदल आणि जास्त ओलावा टाळल्यास भाजी ताजी राहण्यास मदत होते.
भेंडी स्वयंपाकासाठी वापरण्याच्या आधी धुणे अधिक योग्य ठरते. यामुळे साठवणुकीदरम्यान भेंडीवर अतिरिक्त ओलावा राहणार नाही आणि ती चिकट होण्याचा धोका कमी होईल.