Maharashtra News Live Update: कोल्हापुरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

Marathi Breaking Live Headlines Updates: गणरायाचे थाटामाटात आगमन, अमित शहांचा मुंबई दौरा, मनोज जरांगेंचे आंदोलन, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

कोल्हापुरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

आजपासून गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला विशेष महत्त्व असून, दरवर्षी मोठ्या उत्साहात या मिरवणुका पार पडतात. आज कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरात गणेश आगमन मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळतोय. एकापाठोपाठ एक गणेश मंडळे आपल्या लाडक्या गणरायाला घेऊन मिरवणुकीने पुढे जात आहेत. आकर्षक रोषणाई आणि विविध प्रकारच्या साऊंड सिस्टिममुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राजारामपुरी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार यंदाच्या गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी अथवा डीजेचा वापर करण्यास निर्बंध आहेत. त्यामुळे नियमांचे पालन होत आहे की नाही, यावरही पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करत पोलीस प्रशासन आणि मंडळांच्या नियोजनाचे केले कौतुक

सातारा शहरात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस प्रशासनासोबत आगमन मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांनी केलेल्या उत्तम आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे वाहतुकीची अडचण न आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंडळांच्या सहकार्यामुळे नागरिकांना विनात्रास आणि आनंदात गणेशोत्सव साजरा करता येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच आगामी विसर्जन मिरवणुकीचे नियोजनही यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील यांनी 18 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणासाठी मागितली परवानगी

19 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी असल्याने 18 सप्टेंबरला परवानगी मिळण्याबाबत केला अर्ज....

5 ते 50 लोकच आंदोलनात सहभागी होणार तर 10 स्वयंसेवक असणार म्हणून जरांगे यांच्याकडून पोलिसांना हमीपत्र...

आंदोलनादरम्यान वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही नुकसान होणार नाही आणि सार्वजनिक शांतता अबाधित राखली जाईल मनोज जरांगे यांचे हमीपत्र...

मनोज जरांगे पाटील उद्या अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार..

पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील रासायनिक लेपनाची प्रक्रिया करायला अखेर मुहूर्त लागला आहे. त्यानुसार, आता 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत भारतीय पुरातत्व विभागाकडून विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवर हे लेपन होणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी सांगितले आहे.

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

रस्त्यातील झाडं तोडत असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद

- तीन ते चार अज्ञातांनी रातोरात कापली शेकडो झाडे

- डिझेल कटरच्या साह्याने तोडली रस्त्याच्या डिव्हायडर मधील झाडे

शेतकऱ्यांसह कष्टकरी कामगारांच्या घरी सुख शांती, समृध्दी लाभो : माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील

माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन थाटामाटात झाले असून त्यांनी कुटुंबीयांसह गणपती बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करून बाप्पाचे पूजन करून शेतकऱ्यांसह कष्टकरी कामगार वर्गाच्या सुखशांती समृध्दीची गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन

मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी महसूल व परिवहन राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे ८५ व्या वर्षी आजारपणामुळे निधन झाले आहे.

अमित शहांनी घेतलं लालबाग राजाचं दर्शन

अमित शहा यांनी लालबाग राजाचं दर्शन घेतलंय. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते.

लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाचा जन्मसोहळा; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर

अष्टविनायकापैकी एक असलेल्या लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मज गणपतीचा जन्मोत्सव आज भक्तिमय वातावरणात साजरा झाला. जन्मसोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी झाली असून, जयघोषाने लेण्याद्रीचा डोंगर दुमदुमून गेला.

अभिनेता शिव ठाकरेच्या घरी बैलगाडीतून गणपतीचे आगमन

मराठी बिग बॉस विजेता अभिनेता शिव ठाकरेच्या अमरावतीच्या घरी मोठ्या जल्लोषात ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत बैलगाडीतून गणपतीचे आगमन झाले. यावेळी कमरेला ढोल बांधत शिव ठाकरे यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला.

भुसावळमध्ये संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

भुसावळमध्ये संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

भुसावळ शहरातील संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे गेल्या २५ वर्षांपासून गणरायाची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्याची परंपरा कायम आहे.

यंदाही विद्यार्थ्यांनी उत्साहात बाप्पाची भव्य मिरवणूक काढली. मिरवणुकीत महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला.

माणगावमधील साले गावात तलावातुन गणेश मुर्तीची पालखी काढण्याची आगळी परंपरा

कोकणात वेगवेगळ्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये रायगड जिल्ह्यातील माणगावमधील साले गावात भरलेल्या तलावातुन गणपती बाप्पाची पालखी मिरवणुक काढण्याची आगळी वेगळी परंपरा आहे. मंदीरातुन निघालेली हि पालखी मंदीरा शेजारील पाण्याने भरलेल्या तलावातुन गावात जाते. हि पालखी गावातुन पुन्हा मंदीरात आली की साले गावातील गणेशोत्सवाल प्रारंभ होतो. पिढ्यान पिढ्या चालत आलेली हि अनोखी परंपरा साले ग्रामस्थ आजही पुढे चालवत आहेत.

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

- नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

- रस्त्यातील झाडं तोडतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद

- तीन ते चार अज्ञातांनी रातोरात कापली शेकडो झाडे

- डिझेल कटरच्या साह्याने तोडली रस्त्याच्या डिव्हायडर मधील झाडे

- नाशिकमधील वृक्षतोडीने शहरात एकच खळबळ

- नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल

- या वृक्षतोडी मागे कुणाचा हात उपमहापौर विलास शिंदे यांनी उपस्थित केला सवाल

- सदर वृक्षतोडी प्रकरणाची प्रशासनाने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

- महापालिका आयुक्तांकडूनही सदर वृक्षतोडीची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांना पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश

- या वृक्षतोडीसंदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांनी

मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली...

काल परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे यांच्याकडून दुसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता..

आज पुन्हा एकदा आझाद मैदान पोलिसांनी मुंबई आंदोलनाची परवानगी नाकारली आहे

जेजुरीच्या खंडोबा गडावर गणरायाचे आगमन

येळकोट येळकोट’च्या गजरात ‘गणपती बाप्पा मोरया’

जेजुरीच्या खंडोबा गडावर भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाचे आगमन झाले. ‘येळकोट येळकोट’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गड परिसर दुमदुमून गेला.

साईबाबांच्या समाधी मंदिरात चांदीचा नवा नंदी विराजमान..

साईभक्तांकडून कोट्यवधींचे दान -

_______________

साईंच्या समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची प्रतिष्ठापना...

गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर चांदीच्या नव्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना...

आग्रा येथील साईभक्तांकडून 54 किलो 65 ग्रॅम चांदीचा नंदी आणि बेस अर्पण...

चांदीच्या नंदी आणि बेसचे देणगीमूल्य तब्बल 1 कोटी 20 लाख 56 हजार रुपये...

नंदीला सुशोभित करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचे शिंग आणि बिंदीही अर्पण...

सोन्याच्या अलंकारांचे वजन 98 ग्रॅम 600 मिलीग्रॅम, देणगीमूल्य 13 लाख 85 हजार 132 रुपये...

जुन्या नंदीचे उत्तरपूजन करून नव्या नंदीची धार्मिक विधीपूर्वक प्रतिष्ठापना...

भक्तिमय वातावरणात पार पडला प्रतिष्ठापना सोहळा...

देणगीदार साईभक्तांच्या विनंतीवरून नावे गोपनीय ठेवण्यात आली..

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी विवीध बाप्पाचं पूजन

सपत्नीक पूजा करत गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली..

दरवर्षी प्रमाणे सर्व कुटुंबीयांनी बाप्पाची आरती केलीय...

जरांगे पाटलांच्या आंदोलनावर शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण; म्हणाले, “त्यांना अर्धसत्य माहिती मिळतेय” 

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली.
जरांगे पाटील ज्या काही गोष्टी सांगतात, त्या पूर्ण सत्य नसून अर्धसत्य असल्याचा दावा देसाई यांनी केला.
या प्रकरणात काही गैरसमजही निर्माण झाले असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकारची प्रक्रिया प्रामाणिकपणे सुरू असल्याचे देसाई म्हणाले.

सुनील शेळके यांच्या घरी लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना; अजितदादांच्या आठवणीने भावुक

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या घरी आज लाडक्या बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. कुटुंबीय, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना शेळके भावुक झाले आणि “दादांची रोज आठवण येते,” असे म्हणाले.

कल्याणच्या प्रसिद्ध कुंभारवाड्यात बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचा जयघोष 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या प्रसिद्ध कुंभारवाड्यातील गणपती कार्यशाळांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी सजलेल्या गाड्या, ढोल-ताशांचा गजर आणि उत्साही वातावरणामुळे परिसर भक्तिमय झाला आहे.
कुटुंबासह भाविक कार्यशाळांमध्ये दाखल होत असून आपल्या पसंतीची गणेशमूर्ती घेण्यासाठी मोठी लगबग सुरू आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन; गणपतीसमोर साकारला कृषीचा खास देखावा 

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन झाले. गणरायासमोर कृषी विभागाशी संबंधित फळे, विविध पिके आणि शेतीवर आधारित आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे.

दोंडाईच्यात रावल गढीवर थाटात श्रीमंत राजा गणपतीची स्थापना; सरकार साहेब रावल यांच्या हस्ते विधिवत पूजन

दोंडाईचा येथील ऐतिहासिक रावल गढीवर अनेक दशकांची परंपरा जपत श्रीमंत राजा गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. रावल संस्थानचे प्रमुख तथा प्रसिद्ध उद्योगपती सरकार साहेब रावल यांच्या हस्ते सपत्नीक गणपतीची स्थापना करण्यात आली.
यावेळी दोंडाईचा शहराच्या नगराध्यक्षा सौ. नयनकुंवरताई रावल आणि सरकार साहेब रावल यांनी श्रींची आरती केली. गणेशोत्सवानिमित्त रावल गढी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.

अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे Live

जरांगे पाटील उद्या मुंबईच्या दिशेने निघणार

जरांगे पाटलांचा उपोषणाचा १७ वा दिवस

मुंबईत आंदोलनाचा जरांगे पाटलांचा निर्धार

सलाईन, पाणी सोडल्याने त्रास होतोय

पुण्यात तालचक्र ढोल ताशा पथकाकडून संबळ वादन

पुण्यात तालचक्र ढोल ताशा पथकाकडून संबळ वादन

ढोल ताशा सोबत संबळ वादनाचे अनोखे फ्युजन

अखिल मंडई मंडळ गणपती समोर संबळ वादन

येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात तालचक्र पथकाच्या वादकांनी जिंकले उपस्थितांचे मन

मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील निवासस्थानी लाडक्या गणरायाचे आगमन

राज्य पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा शहरातील 'कोयना दौलत' या निवासस्थानी पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि पालखीतून मिरवणूक काढून लाडक्या बाप्पाचे अत्यंत उत्साहात आगमन झाले.

यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या पत्नी स्मिता देसाई आणि यशराज देसाई कन्या ईश्वरी देसाई यांनी बाप्पाचे औक्षण केले.

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात

पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात

सर्वत्र आनंदाचे वातावरण

Ravindra Phatak : ठाण्यात आमदार रविंद्र फाटकांच्या घरी गणरायाचं थाटात आगमन

ठाण्यात आमदार रविंद्र फाटकांच्या घरी गणरायाचं थाटात आगमन

फुलं-पानांच्या आरासीतून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

Nashik : बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असताना नाशिकच्या येवला शहरात गणरायाच्या आरासीत चांदीच्या वस्तूंची क्रेझ पाहायला मिळत आहे.

चांदीचा गणपती, चांदीचे मोदक, चांदीचे उंदीरमामा, एवढंच नाही तर चांदीची जास्वंदी आणि गुलाबाची फुलंही सध्या भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

Ganpati Aagman : रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन

रायगड जिल्ह्यात घरोघरी गणरायाचे आगमन झालं आहे. सकाळ पासून या आगमन सोहळ्याला प्रारंभ झाला पारंपारीक वाद्य शहरी भागात कुटूंबीयांनी तर ग्रामिण भागात ग्रामस्थांनी मिरवणुकीने गणरायाला घरी आणले. ग्रामिण भागात गावातील मंदिरातून डोक्यावर गणेशमूर्ती घेऊन गणेश भक्त आपापल्या घरी निघाल्याची ही दृष्य पहायला मिळत आहेत.

Pune: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

पुणे -

परिमंडळ दोनमधील ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

सराईत गुन्हेगारांवर पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा

परिमंडळ दोनमधील सात पोलिस ठाण्यांच्या अभिलेखावरील ७०१ सराईत गुन्हेगारांना गणेशोत्सव कालावधीत संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश आणि वास्तव्य करण्यास मनाई

गणेशोत्सवातील सार्वजनिक कार्यक्रम,मिरवणुका आणि अन्य सार्वजनिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासही त्यांना प्रतिबंध

Yavatmal: यवतमाळमध्ये गणरायाचे पारंपारिक वाद्याच्या निनादात जल्लोषात स्वागत

पोलिस प्रशासनाने कर्णकर्कश डीजे तसेच ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाद्यांना परवानगी नाकारल्याने यवतमाळ येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रातील गणेशोत्सव मंडळाने यंदा पारंपरिक पद्धतीने गणरायाचे स्वागत केले.

पारंपरिक ढोलकी, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची उत्साहात स्थापना करण्यात आली.

डीजेच्या दणदणाटाऐवजी पारंपरिक वाद्यांचा निनाद करत मंडळाने ध्वनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश दिला.

Beed: गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू

बीड- गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची जोदरार तयारी सुरू.

मोठ मोठाले बॅनर बनवून, जय्यत तयारी अंतिम टप्प्यात.

आम्ही मराठे बायकोच कुंकू पुसून मु़ंबईला निघण्यासाठी सज्ज.

काही गद्दार मराठयांना सांगण आहे,

मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना काय दिल आसेल तर आमच आख्य खानापूर गाव कुणबी मध्ये गेल आहे.

Pune: मावळात गुटख्याची मोठी तस्करी, आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

मावळ तालुक्यातील शिरगाव-परंदवडी पोलिसांनी कारवाई करत बंदी असलेला रजनीगंधा गुटखा, सुगंधी तुळशी तंबाखू आणि एक आयशर टेम्पोसह तब्बल ७९ लाख ४६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर नाकाबंदी आणि वाहन तपासणी सुरू असताना पोलिसांना संशयास्पद आयशर टेम्पो आढळला.

तपासणी केली असता वाहनामध्ये गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा मोठा साठा आढळून आला.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रजनीगंधा गुटखा किंमत ४२ लाख ४३ हजार २०० रुपये, सुगंधी तुळशी तंबाखू १४ लाख ४० हजार रुपये, तसेच इतर मुद्देमाल जप्त केला.

Sangli: सांगलीमध्ये भीषण अपघात, कार वारणा नदीत कोसळली

सांगलीमध्ये भीषण कार अपघात

वारणा नदीच्या पुलावरून कार थेट नदीपात्रात

कठडा तोडून कार 15 फूट खोल नदीपात्रात पडली

अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान..

अपघातामध्ये कारमधील व्यक्ती जखमी झाला

Ratnagiri: रत्नागिरीमध्ये होडीत विराजमान होत गणरायाचं आगामन

रत्नागिरी - होडीत विराजमान होत गणरायाचं आगामन

ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे मंगलमय आगमन

मंगलमुर्ती मोरया गणपती बप्पा मोरया

कोकणात भक्तीभाव उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात गणेशोत्सवाला दिमाखदार सुरवात

पारंपारिक आणि वैशिष्ठपुर्ण गणेशोत्सवाला थाटामाटात सुरवात

संगमेश्वर तालुक्यातील भातगाव खाडीतून चक्क होडीतून आणले जातात गणराय

जलमार्गावरील बाप्पाच्या आगमनाचा सोहळा सर्वांचाच आकर्षण बिंदू

Ahilyanagar: सिद्धटेक येथे गणेश चतुर्थीनिमित्त भक्तिमय वातावर, सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

कर्जत तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र सिद्धटेक येथे गणेश चतुर्थीनिमित्त धार्मिक उत्साहाचे वातावरण आहे.

उजव्या सोंडेच्या श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी परिसरासह राज्याच्या विविध भागांतून भाविक सिद्धटेक येथे दाखल होत आहेत.

दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.सिद्धटेक येथे मागील चार दिवसांपासून गणपती बाप्पांचा माग उत्सव सुरू आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त श्रींची विशेष पूजा, अभिषेक, आरती व नैवेद्याचे धार्मिक कार्यक्रम होत आहेत.

Pune: मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू

पुणे -

मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू

मिरवणुकीत भेसळ रोखा असे फ्लेक्स

Buldhana: बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण

बुलडाणा -

बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण

तीन आठवडे स्वाइन फ्लूचा रुग्ण विविध डॉक्टरांकडे उपचार घेत फिरल्याने आजार पसरण्याचा वाढला धोका

खासगी डॉक्टरांकडून इपिडेमिक ऍक्ट 1897 चं उल्लंघन झाल्याचा आरोप

Nagpur: नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई

नागपूर -

- नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई.

- वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार.

- सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसारही कारवाईचे निर्देश.

- मनपाच्या १० झोनमध्ये दररोज प्रत्येकी १० किलोमीटर कारवाई.

- शहरात रोज १०० किलोमीटर अतिक्रमण निर्मूलनाचे ‘मिशन १०० डे’.

- महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी फूटपाथ पूर्णपणे मोकळे करण्याचे निर्देश.

- ई-रिक्षा आणि ऑटोरिक्षांसाठी स्वतंत्र थांबे निश्चित केले जाणार.

- रस्त्यावर सिलेंडर ठेवून व्यवसाय करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल होणार.

Pune: मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक

पुणे -

मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक

मुख्य मंदिरातून सकाळी ८ वाजता होणार आगमन मिरवणूक सुरुवात

मयूर रथाला आकर्षक फुलांची आरस

रंगीबेरंगी फुलांनी सजला दगडूशेठ गणपती बाप्पाचा रथ

Nashik: नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

नाशिकच्या बागलाण मधिल निकवेल येथे धूमाकुळ घालणारा बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

निकवेल परिसरात अनेक वेळेस बिबट्याने रात्रीच्या वेळे सेतक-यांना दर्शन दिले होते.तर बिबट्याने शेतक-यांच्या पाळीव पशूधन फस्त केले होते.

अखेर वनविभागाने जोरण रस्त्यावरील शेतकरी अरुण उत्तम वाघ यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला असता रात्री उशिरा बिबट्या पिंज-यात जेरबंद झाला.

बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांनी बिबट्याच्या दहशतीपासून मुक्त झाले आहे.

konkan: तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन

तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोचला असून वाजत गाजत लाडक्या बाप्पाला घरी आणण्याची लगबग सुरू झाली आहे.

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात गणपती बाप्पाचे आगमन होत असून गणेश भक्तासह बच्चे कंपनीचा उत्साह शिगेला पोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com