सातारा : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निमित्त वाहतूकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

traffic diverted on eve of sant dnyaneshwar maharaj palkhi sohala from 6 july onwards : पालखी सोहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळयातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी ये-जा करतील याची इतर वाहनधारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन सातारा पाेलिस दलाने केले आहे.
traffic diverted on eve of sant dnyaneshwar maharaj palkhi sohala from 6 july onwards
traffic diverted on eve of sant dnyaneshwar maharaj palkhi sohala from 6 july onwardsSaam Digital

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येत्या 6 जूलैला सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पालखी साेहळा निमित्त सातारा पाेलिस दलाने 6 ते 11 जूलैपर्यंत पालखी मार्गावरील वाहतुकीत माेठा बदल केला. त्याबाबतची माहिती नुकतीच सातारा पाेलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.

traffic diverted on eve of sant dnyaneshwar maharaj palkhi sohala from 6 july onwards
Vitthal Rukmini Mandir Pandharpur: विठ्ठल भक्तीतून 8 महिन्यांत 30 लाखांची देणगी, पंढरपूर मंदिर समितीकडून राहुरीमधील भाविकाचा सन्मान

सातारा जिल्ह्यातून पालखी मार्गक्रमण करणार असल्याने 5 जूलै सकाळी 6 पासून 9 जूलै रात्री 12 वाजेपर्यंत फलटण येथून पुणे, निरा, लोणंदकडे जाणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पूणेकडे शिरगांव घाटातून वळविणेत येत आहे. 5 जूलै सकाळी 6 पासून ते 8 जूलै रात्री 12 वाजेपर्यत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणारे वाहनाखेरीज इतर वाहनांना बंद राहील.

5 जूलै सकाळी 9 पासून 10 जूलै दुपारी 1 वाजेपर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटणकडे वळविण्यात आली आहे. 5 जूलै मध्यरात्रीपासून 9 जूलै मध्यरात्रीपर्यंत फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद राहील. 9 जूलै रात्रीच्या 12 वाजल्यापासून ते 11 जूलैच्या दुपारी चार वाजेपर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद राहील. अकलूज येथून बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.

traffic diverted on eve of sant dnyaneshwar maharaj palkhi sohala from 6 july onwards
Ratnagiri Dapoli Rain: अरे बापरे! दापोली जामगे देवाचा डोंगर रस्ता 150 मीटरपर्यंत खचला; वाहतूक बंद

9 जूलै रात्री 12 वाजल्यापासून 11 जूलै दुपारी 4 वाजेपर्यंत नातेपुतेकडून फलटण मार्गे साताराकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे मार्गे दहिवडी-सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक नातेपुते-दहीगाव-जांब-बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे. याबराेबरच नातेपुते-वाई- वाठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे-शिंगणापूर-जावली-कोळकी-झिरपवाडी-विचुर्णी-ढवळपाटी- वाठार फाटा मार्गे वळविण्यात येत आहे.

दहा जूलैलाा पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड मुक्कामी सकाळी ६.०० वा. मार्गस्थ होणार आहे. सदर वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होवूनये म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपुर रोडने बरड कडे जाण्याऐवजी फलटण-दहिवडी चौक-कोळकी शिगणापूर तिकाटणे-वडले-पिंप्रद-बरड अशी वळविण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

traffic diverted on eve of sant dnyaneshwar maharaj palkhi sohala from 6 july onwards
Tuljapur : 'त्या' प्रकरणात गुन्हे दाखल करा, तुळजापुरात हिंदू जनजागृती समितीचे घंटानाद आंदोलन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com