Manasvi Choudhary
नऊवारी साडी नेसल्यावर प्रत्येक महिला अस्सल मराठमोळ्या रूपात दिसते. पण हा पारंपारिक लूक करण्यासाठी महिला पारंपारिक मंगळसूत्र घालतात.
पारंपरिक मंगळसूत्रात अनेक डिझाईन्स आहेत. सोन्याच्या वाट्यांची आणि मण्यांची मंगळसूत्रे नऊवारीवर सर्वात सुंदर दिसतात.
सोन्याच्या दोन वाट्यांचे मंगळसूत्र नऊवारी साडीवर सर्वात जास्त शोभून दिसते. यामध्ये दोन वाट्यांच्या मध्यभागी सोन्याचे अंतर किंवा मणी असतात.
जर तुम्हाला थोडासा भरगच्च लूक हवा असेल, तर कोल्हापुरी मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.
काळ्या मण्यांच्या माळींसोबत बारीक मोती असलेली मंगळसूत्रे तुम्ही निवडू शकता. जे नऊवारी साडीवर सर्वात जास्त उठून दिसते.
पारंपारिक वाटीच्या डिझाईनमध्येच थोडा मॉडर्न टच हवा असल्यास, वाट्यांच्या वर लाल-हिरवे खडे किंवा कुंदन जडवलेले मंगळसूत्र निवडा.
सोन्याचे लहान मणी आणि काळे मणी एकत्र गुंफून तयार केलेली दुहेरी किंवा तिहेरी चेन मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. .