Manasvi Choudhary
गणेशोत्सव किंवा हरतालिकेचा उपवास अनेकजण करतात. अनेकजण उपवासाला चहा- कॉफी पितात तर अनेकांना उपवासाला चहा- कॉफी प्यावी की नाही असा प्रश्न पडला आहे.
उपवासात चहा किंवा कॉफी प्यावी की नाही ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
अनेकांना उपवासाच्या दिवशी कोरा चहा पिण्याची सवय असते.
उपवासाच्या दिवशी तुम्ही रिकाम्यापोटी चहा - कॉफी प्यायल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. छातीत जळजळ, गॅस, आम्ल त्रास होऊ शकतो.
उपवासाच्या चहात साखरेऐवजी गूळ किंवा खजूर मिक्स करा. अति गोड चहामुळे शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.
चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊ शकते
जर तुम्हाला उपवासात गॅस किंवा अॅसिडिटीचा त्रास होत असेल, तर चहाऐवजी ताक, नारळ पाणी, लिंबू पाणी किंवा कोमट दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.