Manasvi Choudhary
उद्यापासून घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी गणरायाचं थाटामाटात आगमन होणार आहे.
अनेक घरांमध्ये कौटुंबिक परंपरा किंवा सोयीनुसार दीड दिवसांच्या गणपतीची स्थापना केली जाते. पहिल्या दिवशी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून दुसऱ्या दिवशी अत्यंत भक्तीभावाने बाप्पाचे विसर्जन केले जाते.
काही कुटुंबामध्ये तिसऱ्या दिवशी बाप्पाला निरोप देण्याची परंपरा असते. सलग तीन दिवस मनोभावे सकाळी-संध्याकाळी आरती, नैवेद्य आणि बाप्पाची सेवा करून तिसऱ्या दिवशी गणपती मूर्तीचे विसर्जन केले जाते.
पाच किंवा सात दिवसांच्या गणेशोत्सवामध्ये घरातील सर्व मंडळी, नातेवाईक आणि पाहुणे बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. पाचव्या किंवा सातव्या दिवशी महाप्रसाद आणि आरती करून मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले जाते.
गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा हा उत्सव थेट अनंत चतुर्दशीपर्यंत चालतो. १० दिवस चालणारा हा उत्सव महाराष्ट्राची संस्कृती आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. या १० दिवसांत बाप्पाची मनोभावे सेवा करून अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन सोहळा अत्यंत डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखा असतो.
शास्त्रात किंवा परंपरेत गणपती किती दिवस बसवावा, याचे कोणतेही नियम नाही. ही पूर्णपणे कुटुंबाची श्रद्धा आणि कौटुंबिक परंपरा मानली जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.