Manasvi Choudhary
१४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गणेशोत्सव सण म्हटलं की मोदकाचा नैवेद्य नजरेसमोर येतो.
गणपती बाप्पााला २१ मोदकाचा नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र अनेकांना प्रश्न पडतो की, तळलेले की उकडीचे, गणपतीच्या नैवेद्यासाठी कोणते मोदक फायदेशीर आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
गणपतीसाठी पारंपारिक उकडीच्या मोदकांना विशेष स्थान आहे. तांदळाच्या पिठाची उकड घेऊन त्यात ओल्या नारळाची आणि गुळाची गोड सारण भरून हे मोदक बनवू शकता.
उकडीचे मोदक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. वाफेवर शिजवले मोदक पचायला देखील हलके असते.
तळलेले मोदक हे सामान्यपणे मैदा किंवा गव्हाच्या पिठापासून तयार केले जातात. ड्रायफ्रुट्स, खोबरे आणि गुळाचे सारण भरून तुम्ही हे मोदक बनवा.
उकडीचे मोदक थंड झाल्यावर कडक होऊ शकतात, मात्र तळलेले मोदक दीर्घकाळ टिकतात आणि प्रवासात नेण्यासाठी किंवा पाहुण्यांना देण्यासाठी सोपे पडतात.
उकडीच्या मोदकापेक्षा तळलेल्या मोदकांमध्ये कॅलरीज जास्त असतात यामुळे वजनावर परिणाम होतो.