Pune : प्रायव्हेट पार्टला हळद कुंकू लावलं,पतीचा मंगळदोष काढण्यासाठी अघोरी पूजा, पुण्यात भयंकर प्रकार

Pune Crime News : पुण्यातील चंदननगर परिसरात पतीचा मंगळदोष दूर करण्याच्या नावाखाली विवाहित महिलेवर अघोरी प्रकार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsAI Image
Published On
Summary
  • पुण्यातील चंदननगर परिसरात मंगळदोषाच्या नावाखाली विवाहित महिलेवर अघोरी प्रकार

  • पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी महिलेला भोंदूबाबाकडे नेल्याची तक्रार

  • महिलेवर मानसिक आणि शारीरिक छळ

  • अंगारा पाजणे आणि गुप्तांगाला हळद-कुंकू वाहून पूजा करण्यास भाग पाडल्याचा आरोप

सचिन जाधव, पुणे

एककीकडे अशी कथा आहे की सावित्रीने आपल्या पतीला मरणाच्या दारातून परत आणण्यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या आणि आपल्या सत्यवानाला दीर्घायुष्य मिळवून दिल. मात्र दुसरीकडे कलियुगात देवदेवतांच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार पाहायला मिळत आहे. पतीचा मंगळदोष दूर करण्याच्या नावाखाली एका विवाहित महिलेने अघोरी प्रकार केला. सदर घटना पुण्यात पुण्यातील चंदननगर परिसरात घडली असून पोलिसांनी महिलेच्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ११ एप्रिल ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संबंधित प्रकार घडला. तक्रारदार महिलेकडे लग्नासाठी १५ लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी दोन लाख २० हजार रुपये तिने ऑनलाइन पद्धतीने दिले. मात्र, उर्वरित रक्कम न दिल्याने तिचा मानसिक छळ सुरू करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

Pune Crime News
Sleeping Position : डावी की उजवी कुशी? झोपण्याची कोणती पोझिशन आरोग्यसाठी आहे बेस्ट, जाणून घ्या

दरम्यान, महिलेच्या पतीचा मंगळदोष असल्याचे सांगून तो दूर करण्यासाठी तिला एका भोंदूबाबाकडे नेण्यात आले. संबंधित व्यक्तीच्या सांगण्यावरून पाण्यात अंगारा टाकून तो पाजण्यासह विविध अघोरी प्रकार करण्यास तिला भाग पाडल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच तिच्या गुप्तांगाला हळद-कुंकू वाहून पूजा करून घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Pune Crime News
Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

या प्रकरणी २९ वर्षीय विवाहितेने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार प्रदीप मनोहर पाटील (वय ३२), मालण मनोहर पाटील (वय ५२), प्रतीक्षा मनोहर पाटील (वय २९, सर्व रा. सरोळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), प्रितम मनीष पाटील (वय ३०) आणि मनीष पाटील (दोघे रा. नांदेड सिटी, पुणे) यांच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com