ACP AShok Dhumal Passed Away Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन; पुणे पोलीस दलावर शोककळा

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. ३० जानेवारी २०२४

Pune News:

पुणे शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. १५ जानेवारी रोजी पाय घसरून तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले होते, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानचा त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शहर पोलिस दलात शोककळा पसरली आहे.

अशोक धुमाळ हे सातारा (Satara) जिल्ह्याचे सुपुत्र होते. पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्यांनी राज्यातील विविध शहरांमध्ये काम केले होते. गेल्यावर्षीच त्यांची पुणे शहर सहायक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते पुण्यातील (Pune) कात्रज परिसरात वास्तव्यास होते.

१५ जानेवारी रोजी पाय घसरून तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले होते. त्यांच्या पायाला आणि बरगड्यांना फ्रॅक्चर झाले होते. त्यांच्यावर भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर साध्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते.

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परंतु प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी रूबी हॉल क्लिनिकमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास धुमाळ यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : कुत्रे मागे लागताच चिमुकली प्रचंड घाबरली; जीवाच्या आकांताने पळाली, पण शेवटी मृत्यूने गाठलंच

Marathi News Live Updates : शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांना टिंगल करण्याचा अधिकार आहे.

हॉटस्टार किंवा Sony नव्हे, तर इथे पाहा IND vs BAN मालिका फुकटात

Amruta Khanvilkar : पाहून तुझं रुप काळजाची वाढली धाकधुक

Maharashtra Politics: विधानसभेआधी भाजपला तगडा झटका! राजेंद्रकुमार गावितांचं अखेर ठरलं, काँग्रेसशी 'हात'मिळवणी!

SCROLL FOR NEXT