अक्षय बडवे, पुणे
पुणे-सातारा महामार्गावर विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील ससेवाडी गावाच्या हद्दीत ही अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रकने चार वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघाताची घटना घडली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावरील ससेवाडी गावाच्या हद्दीत ट्रकने चार वाहनांना धडक दिल्यानं विचित्र अपघात झाल्याची घटना घडली. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाचे ससेवाडी गावाजवळील उड्डाणपुलावर ट्रकवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर भरधाव ट्रकची एसटी बस, पिक अप, टेम्पोसह कारला धडक बसली.
सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत. तर यातील एक जण गंभीर आहे. अपघातानंतर महामार्गावर काही काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती, क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन पोलिसांनी बाजूला करून वाहतुक कोंडी सोडवली.
उत्तर प्रदेशात बुंदलखेड एक्स्प्रेसवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे तीन ट्रकची एकमेकांना धडक झाली. दाट धुक्यातील अपघातामुळे शॉर्ट सर्किट होऊन ट्रकला आग लागल्याची घटना घडली. या अपघातात एका चालकाने उडी मारून स्वत:चा जीव वाचवला. तर तिघे जखमी झाले आहेत. (Latet Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, बुंदलखेड एक्स्प्रेसवर तीन ट्रक एकमेकांवर आढळले. या अपघाताची माहिती मिळताच सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या अपघात जखमी झालेल्या तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
अपाघातानंतर लागलेल्या दोन ट्रकला आग लागली. तर अपघातानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. मात्र, अग्निशमन दलाचे जवान पोहोचेपर्यंत दोन ट्रक जळून खाक झाले होते.
पोलीस अधिकारी महेंद्र प्रताप यांनी सांगितलं की, 'बुंदेलखंड एक्स्प्रेसवर दाट धुके रस्त्यावर पसरल्याने तीन ट्रकने एकमेकांना धडक दिली. या अपघातात चालक जखमी झाला. पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून चालकाला रुग्णालयात दाखल केलं. तिन्ही ट्रकची एकमेकांना धडक झाल्याने आग लागली. अपघात झाल्यानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. पण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत वाहतूक कोंडी सोडवली'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.