Samruddhi Mahamarg Accident News : पुण्याहून अमरावतीला निघालेल्या कारचा समृद्धी महामार्गावर अपघात, युवक ठार

या धडकेत कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला.
samruddhi mahamarg
samruddhi mahamargsaam tv
Published On

- मनाेज जयस्वाल

Washim News :

समृद्धी महामार्गवर (samruddhi mahamarg accident) कारने कंटेनरला मागून धडक दिली. या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. हा अपघात वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील लोकेशन क्रमांक 234 वर झाल्याचे पाेलिसांनी नमूद केले. (Maharashtra News)

या अपघाताची पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार अपघातग्रस्त कार पुण्यावरून अमरावतीच्या दिशेने निघाली हाेती. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात चालत्या कंटेनरला कारने मागून धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त हाेती की कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला.

samruddhi mahamarg
Prakash Shendge News : बच्चू कडू ओबीसींच्या अन्नात माती कालवताहेत : प्रकाश शेंडगे

या अपघातात शकील पठाण (वय 27) हा जागीच ठार झाला तसेच अनिकेत चंदू जाधव (वय 28) हा जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताचा लोकेशन 108 मालेगाव हे घटनास्थळी दाखल झाले. त्यातील पायलट आणि वैद्यकीय अधिकारी यांनी जखमी रुग्णांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

samruddhi mahamarg
Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मनाई आदेश लागू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com