Maharashtra SSC Hall Ticket 2023 : दहावीच्या परीक्षेबाबत मोठी अपडेट! 'या' दिवशी मिळणार हॉल तिकीट, ऑनलाइन कसं कराल डाऊनलोड? जाणून घ्या

SSC Exam hall Ticket Update: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉल तिकीट विद्यार्थ्यांना बुधवारपासून म्हणजे ३१ जानेवारीपासून मिळणार आहे.
ssc and hsc exam
ssc and hsc examSaam TV
Published On

SSC Exam hall Ticket:

दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठी अपडेट हाती आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉल तिकीट विद्यार्थ्यांना बुधवारपासून म्हणजे ३१ जानेवारीपासून मिळणार आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची हॉल तिकीट विद्यार्थ्यांना ३१ जानेवारीपासून मिळणार आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमार्फत हॉल तिकीट मिळणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव यांनी दिली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ssc and hsc exam
Narendra Modi: कोरोना काळात लोकांनी थाळीनाद का केला? PM नरेंद्र मोदींनी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगितलं कारण

राज्य मंडळाकडून दहावीची बोर्डाची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. तसेच दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

ssc and hsc exam
Gruh Pravesh: गृह प्रवेश करायचाय? जाणून घ्या गृह प्रवेशासाठी फेब्रुवारी महिन्यातील शुभ मुहूर्त

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२४च्या परीक्षेचं हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर बुधवारपासून ‘स्कूल लॉगिन’मध्ये डाऊनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

ssc and hsc exam
Solar Panels: वीज बिल कमी करायचंय? तर बसवा सोलर पॅनेल, ही योजना 'घ्या' जाणून

दरम्यान, दहावीच्या परीक्षेसाठी सर्व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट प्रिंट करून द्यायचे आहेत. हॉल तिकीट प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. तसेच त्या हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com