Solar Panels: वीज बिल कमी करायचंय? तर बसवा सोलर पॅनेल, ही योजना 'घ्या' जाणून

Solar Panels Scheme: वीज बिल कमी यावं, पैसे वाचावे असं सर्वांना वाटतं. यावर एक उपाय आहे. सौर पॅनेल बसवून आपण खर्च वाचवू शकतो. या योजनेबद्दल जाणून घेऊ या.
Solar Panels
Solar Panels Saam Tv
Published On

How To Install Solar Panels

भारत सरकारने सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री सौर रूफटॉप योजना (Solar Panels Scheme) होय. या योजनेंतर्गत, सरकार घरगुती ग्राहकांना सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान देते. अनुदानाची रक्कम सौर पॅनेलच्या एकूण खर्चाच्या 30 टक्के ते 50 टक्क्यांपर्यंत असू शकते.

सरकारला सौरऊर्जेच्या माध्यमातून हरित ऊर्जेला चालना द्यायची आहे. तसंच आगामी काळात सौरऊर्जेच्या माध्यमातून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा सरकारचा हेतु (Solar Rooftop) आहे. त्याचबरोबर सौरऊर्जेच्या माध्यमातून तुम्ही घरात खर्च होणारा वीज खर्चही वाचवू शकता.

सौर यंत्रणेसाठी किती खर्च येणार

तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल (Solar Panels) लावल्यास तुमचं मासिक वीज बिल 3000 रुपयांवरून 240 रुपयांपर्यंत कमी होईल. यासाठी तुम्हाला 3kw चा रुफटॉप सोलर सिस्टम बसवावा लागेल. या सौर यंत्रणेचं आयुष्य 25 वर्षे आहे. त्यासाठी एकूण 1.26 लाख रुपये खर्च येतो. त्यापैकी 54 लाख रुपये अनुदान शासनाकडून मिळणार आहे.

सोलर रूफटॉप

दिल्ली, मुंबई आणि इतर मेट्रो शहरांमध्ये उंच उंच इमारती आहे. तिथे बहुतेक लोकं फ्लॅटमध्ये राहतात. अशा परिस्थितीत या लोकांना सोलर पॅनल बसवणं थोडं अवघड आहे. आपल्याला वैयक्तिक खर्चाने सोलर पॅनल बसवायचे (Solar Panels Scheme) असतील ,तर त्यासाठी RAW ची परवानगी घ्यावी लागेल. तर उंच इमारतींमध्ये सरकारी योजनेंतर्गत सोलर रूफटॉपचा लाभ मिळणार नाही.

Solar Panels
#shorts Subsidy on Rooftop Solar Panel |सोलर रुफटॉपवर मिळवा ४० टक्के अनुदान

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

सर्वप्रथम solarrooftop.gov.in या वेबसाइटवर जा. 'Apply for Solar Rooftop' वर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाका. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाका. तुमची वैयक्तिक माहिती भरा. तुमच्या घराची माहिती भरा. अनुदानाची रक्कम निवडा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सादर करा.

यानंतर, सरकारकडून कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्यानंतर एका विशिष्ट प्रक्रियेनंतर तुम्हाला सोलर रूफटॉप योजनेचा लाभ मिळेल.

Solar Panels
Government Scheme :Pradhan Mantri Solar Panel Yojana: गच्चीवरच करा वीजनिर्मिती..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com