वसईच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविली सोलर कार!

सध्या वाढत्या इंधनाच्या किमती आणि पर्यावरणाचा वाढता धोका पाहता वसईतील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर पर्याय म्हणून सौर उर्जेवर चालणारी तीन चाकी कार बनवली आहे.
Solar Car
Solar Carचेतन इंगळे
Published On

चेतन इंगळे

वसई: सध्या वाढत्या इंधनाच्या किमती आणि पर्यावरणाचा वाढता धोका पाहता वसईतील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर पर्याय म्हणून सौर उर्जेवर चालणारी तीन चाकी कार बनवली आहे. विशेष म्हणजे ही कार पूर्णतः विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात बनवली आहे. यासाठी ३ वर्षे लागले असून ४ लाख रुपये खर्च आला आहे.

वसईतील वर्तक महाविद्यालयातील अभियांत्रिकी शाखेसह मॅकेनिकल, आय टी, संगणक विभागातील ४० मुलांनी ही कार बनवली आहे. त्यांनी शैक्षणिक प्रकल्प म्हणून २०१७ पासून ही कार बनविण्यास सुरवात केली होती.

Solar Car
लातूर: चाकूरमध्ये बनावट दारू तयार करण्याचे साहित्य जप्त!

आधी मुलांनी विद्युत कार बनवली होती. त्यात त्यांनी अधिक संशोधन करून आता त्यांनी याला सौर पॅनलचा उपयोग करून आता ही कार त्यांनी दोनही पद्धतीने बनवली आहे. सध्या ही तीन चाकाची कार असून ती तसी ६५ किमी वेगाने धावू शकते. त्याच बरोबर एकदा चार्ज केल्यावर किमान १२५ किमी प्रवास करता येत आहे. सध्या ही कार रस्त्यावर आली नसली तरी भविष्यातील इंधन पर्याय म्हणून याकडे पहिले जात आहे.

हे देखील पहा-

या विद्यार्थ्याचे मार्गदर्शक प्रा. चौधरी यांनी माहिती दिली की, अद्याप या कारची स्वामित्व नोंदणी केली नाही पण लवकरच केली जाणार आहे. तसेच या कार ची विशेषता म्हणजे ही विनाचालक चालाविता येणार आहे. त्याला एक ठराविक मार्ग दिला असता कार कोणतीही मानवी सहायता न घेता आपल्याला इच्छितस्थळी घेवून जाईल. विद्यार्थ्यांनी या कार वर विशेष मेहनत घेतली आहे. त्याच बरोबर लवकर चार चाकी आणि दुचाकी सुद्धा बनचिण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कारची चर्चा सध्या संपूर्ण वसईत सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com