लातूर: चाकूरमध्ये बनावट दारू तयार करण्याचे साहित्य जप्त!

जिल्ह्यातील चाकूर इथं बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य एका गोदामात असल्याची माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला आहे.
Latur News
Latur Newsदिपक क्षीरसागर
Published On

दिपक क्षीरसागर

लातुर: जिल्ह्यातील चाकूर इथं बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य एका गोदामात असल्याची माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला आहे. या छाप्यात लाखो रूपये किंमतीचे जवळपास पाच टेम्पो साहित्य सापडले आहे. यातून बनावट दारूचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Latur News
जालना: नातेवाईक असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीचे शाळेतून अपहरण; लग्नाचे आमिष अन्...

शहरातील लातूर नांदेड रस्त्यावरील - महाविद्यालयासमोर एक लॉज आहे. हा लॉज अनेक दिवसांपासून बंद आहे. या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. या लॉजमधील गोदामात बनावट दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या बाटल्या, स्टीकर, सील, रिकामे खोके हे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले.

हे देखील पहा-

दोन दिवसांपासून पथकातील कर्मचारी यावर लक्ष ठेऊन होते. बनावट दारू तयार करण्यासाठी हे साहित्य जमा केले असल्याचा अंदाज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा आहे. याचे मोजमाप करून हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जवळपास पाच टेम्पो भरतील एवढे हे साहित्य असून रात्री उशीरापर्यंत याची मोजणी सुरु होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश बारजगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. हे साहित्य कोणाचे आहे याबाबत खात्री करून अधिकाऱ्यांनी सांगितले. यातून बनावट दारू विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com