Jalna Crime News
Jalna Crime Newsलक्ष्मण सोळुंके

जालना: नातेवाईक असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीचे शाळेतून अपहरण; लग्नाचे आमिष अन्...

जालना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील घटना
Published on

लक्ष्मण सोळुंके

जालना: मी मुलीचा नातेवाईक असल्याचं सांगत मुलीच्या पोटात दुखतं असल्याने तिला घरी घेऊन जातोय असे कारण सांगून १४ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना जालना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडली आहे.

अपहरण केल्यानंतर तिला लग्नाचे आमिष;

शिक्षकांना मी मुलीचा नातेवाईक आहे. तिच्या पोटात दुखतं असल्याचं कारण सांगून एका आठवीत शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तीच अपहरण करण्यात आले. ही घटना जालना शहरातील कदीम जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रार वरून कदीम जालना पोलिस ठाण्यात औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील आरोपी तरुणा विरुद्ध इच्छा नसताना लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalna Crime News
राऊतांनी भावनिक उत्तर न देता कायद्याने द्यावे; नोटीस पुराव्यांच्या आधारे- फडणवीस

दरम्यान, पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली. पोलिसांनी तरुणाच्या लोकेशन वरून रात्री दोनच्या सुमारास अपहरण झालेल्या मुलासह आरोपी तरुणाला घनसावंगी तालुक्यातून ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणी मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. गुन्ह्याचे स्वरूप पाहता अधिक तपासासाठी हे प्रकरण पिंक मोबाईल पथकाकडे देण्यात आले आल्याची असल्याची माहिती समोर आली आहे. शाळेतून मुलीचे अपहरण झाल्याने शहरात पालक वर्गात एकच खबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com