नुकतीच विधानसभा निवडणुक पार पडली आहे. विधानसभा निवडणुकीत बनावट मतदान झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे विधानसभा निवडणुकीत ८ शहरी मतदारसंघात बनावट मतदान झाले आहे.
पुण्यातील ८ मतदारसंघात ६०० हून अधिक बनावट मतदान झाले आहे. तसेच काही त्रुटींमुळे टपाली मतदान रद्द करण्यात आले आहे. ३०० टपाली मतदारांचे मतदान रद्द करण्यात आले आहे. या बनावट मतदानापैकी सर्वाधिक मतदान हे वडगाव शेरीत झाले आहे,. (Fake Voting In Pune)
वडगाव शेरीत १६२ बनावट मते देण्यात आली आहे. त्यानंतर कोथरुड मतदारसंघात ९३ बनावट मते दिले गेल्याचे समोर आरले आहे. या दोन्ही मतदारसंघातील बनवाट मतपत्रिका बाद करण्यात आल्या आहेत.
वडगाव शेरी आणि कोथरुडमधील टपालने आलेल्या अनुक्रमे ६५ आणि १८ मतपत्रिका बाद करण्यात आल्या आहेत. बनावट मतदानाच्या घटनेत वाढ होत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून बनावट मतदानाचे प्रकार वाढत आहे. विधानसभा निवडणुकीत बनावट मतदारांची संख्या वाढली असल्याचे निरीक्षण जिल्हा निवडणूक प्रशासनाने नोंदवले आहे. (Fake Voting)
पुण्यातील ८ मतदारसंघात बनावट मतदान नोंदवले गेले आहेत. त्यात हडपसरमध्ये ७८ बनावट मतदान झाले आहे. खडवासल्यात ७५, पर्वतीत ६१, शिवाजीनगरमध्ये आणि पुणे कन्टेन्मेंटमध्ये ४९ आणि कसबा मतदारसंघात ५२ बनावट मते नोंदवली गेली आहे. एकूण ६१९ बनावट मतदानाची नोंद झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.