Pune Car Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारने २ वर्षीय श्रृतिकाला चिरडलं, डॉक्टरविरोधात गुन्हा; थरारक VIDEO समोर

Pune Car Accident: पुण्यात भरधाव कारने २ वर्षांच्या मुलीला धडक दिली. कारच्या चाकाखाली चिरडून या मुलीचा मृत्यू झाला. अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Priya More
  • पुण्यातील आळंदीत भरधाव कारने २ वर्षीय श्रृतिकाला चिरडले

  • या भीषण अपघातात श्रुतिकाचा जागीच मृत्यू

  • आरोपी डॉक्टर प्रथमेश कोकणे यांच्यावर गुन्हा दाखल

  • डॉक्टरला अटक न झाल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पुण्यामध्ये भीषण कार अपघातामध्ये २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. भरधाव कारने चिमुकलीला धडक दिली. चाकाखाली चिरडून या मुलीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी धडा घेतला नसल्याचे या अपघातामुळे समोर आलं आहे. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदीत २ वर्षांच्या चिमुकलीला डॉक्टरच्या भरधाव कारने चिरडलं. या अपघातामध्ये श्रुतिका मिरासेचा जागीच मृत्यू झाला. डॉक्टर प्रथमेश कोकणे (२६ वर्षे) असं आरोपी कारचालक डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टरच्या कारने आधी श्रृतिकाला धडक दिली. आधी कारच्या पुढच्या आणि नंतर मागच्या चाकाखाली येऊन श्रृतिकाचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी डॉक्टरला रोखण्याचा प्रयत्न केला पण डॉक्टरने कारसह धूम ठोकली. मात्र उपस्थितांनी त्याचा पाठलाग केला आणि पुढं चिंबळी फाट्याला त्याला पकडण्यात यश आलं. मग त्याला आळंदी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. पण पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला सोडून दिलं.

अपघाताची संतापजनक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. आमच्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही, दाखल गुन्ह्यात अटकेची तरतूद नाही अशी कारणं पोलिसांकडून दिली जात आहेत. सीसीटीव्हीत जे दिसतंय तो पुरावा पोलिसांच्या दृष्टीने तकलादू असावा. त्यामुळंच पोलिसांच्या भूमिकेवर चहुबाजूंनी टीका केली जात आहे. पोर्श प्रकरणाने पोलिसांची प्रतिमा आधीचं मलिन झालीये त्यातून आळंदी पोलिसांनी काही धडा घेतला नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT