Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव टेम्पोची २० ते २५ वाहनांना धडक, वाहतूक पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न; थरारक VIDEO समोर

Pune Traffic Police: पुण्यामध्ये आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. वाहतूक पोलिसाने अडवले म्हणून टेम्पो चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने २० ते २५ वाहनांना धडक दिली.
Pune Accident News
Pune Accident Saam Tv
Published On
  • पुण्यात भरधाव टेम्पोने २० ते २५ वाहनांना धडक दिली

  • चालकाने वाहतूक पोलिसालाही चिरडण्याचा प्रयत्न केला.

  • या घटनेत अनेक वाहनांचे नुकसान आणि काही जण जखमी झाले.

  • हडपसर पोलिसांनी आरोपी चालकाला केली अटक

सागर आव्हाड, पुणे

Pune Accident Video: पुण्यामध्ये वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील संतोष माने घटनेची पुनरावृत्ती सुदैवाने टळली. पोलिस कारवाईच्या भीतीने टेम्पो चालकाने हे कृत्य केले. अनेक वाहनांना धडक देत टेम्पो चालकाचा पळून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दुचाकीवाले बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिस कारवाईच्या कारवाईच्या भीतीने सुसाट निघालेल्या टेम्पो चालकाने सुमारे २० ते २५ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातामध्ये अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातामध्ये काही प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे -सोलापूर महामार्गावर वानवडी ते रवी दर्शन चौकादरम्यान या थरारक अपघाताची घटना घडली.

Pune Accident News
Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! भरधाव कार दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

दरम्यान नागरिक आणि पोलिसांनी पंधरा नंबर येथे हा टेम्पो अडवला. संतप्त प्रवासी आणि नागरिकांनी टेम्पोवर चढून वाहन चालकाला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. वानवडी परिसरात वाहतूक पोलिसांकडून फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांवर कारवाई केली जात होती. त्यावेळी शहरातून सोलापूरकडे निघालेल्या टेम्पो चालकाला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्या भीतीने टेम्पो चालकाने आपले वाहन सुसाट पळविले.

Pune Accident News
Road accident news: पहाटे अपघाताचा थरार! भरधाव बसची कारला धडक, एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू

टेम्पो सुसाट नेत असताना वाहनचालकाने मार्गातील अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांनी पंधरा नंबर परिसरात हे वाहन अडवले. त्यावेळी संतप्त नागरिकांनी वाहनचालकाला टेम्पोवर चढून चांगला चोप दिला. या अपघाताप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

Pune Accident News
Kolhapur Accident: कोल्हापूरात अपघाताचा थरार, भरधाव कार पुलावरून ओढ्यात कोसळली; एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com