Pune Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: भरधाव टेम्पोने चिमुकल्याला चिरडले, आई गंभीर जखमी; बिबवेवाडीमध्ये भीषण अपघात

Rohini Gudaghe

सचिन जाधव साम टीव्ही, पुणे

Pune Accident News

पुण्यातील बिबवेवाडीमध्ये भरधाव टेम्पोने चिमुकल्याला चिरडल्याची घटना (Pune Accident) घडली आहे. यामध्ये चिमुकल्याची आई गंभीर जखमी झाली आहे. अप्पर उताराच्या रस्त्यावर हा चिमुकला त्याच्या आईसोबत चालला होता. इतक्यात भरधाव टेम्पो आला अन् त्याने चिमुकल्याला धडक दिली. या धडकेमुळे चिमुकला थेट टेम्पोच्या चाकाखाली आला. (Latest Marathi News)

या अपघातात चिमुकल्याचा टेम्पोच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. तर या भीषण अपघात चिमुकल्याची आई गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात काल सायंकाळी म्हणजे ७ एप्रिल रोजी (Accident News) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अप्पर येथे घडला आहे. या अपघातमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अपघातानंतर टेम्पो चालक टेम्पो सोडून पळून गेल्याचं समोर ( Bibwewadi Accident) आलं आहे. रुपाली शिंदे (वय 28 रा. शिवतेज नगर, बिबवेवाडी) असं अपघातात जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे, तर रुद्र सचिन शिंदे (वय 4 वर्षे) असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. अपघातामध्ये रुपाली शिंदे गंभीर जखमी झाल्या आहेत.

टेम्पोचालक अक्षय पवार (वय 24 रा. सुपर, बिबवेवाडी) हा अपघातानंतर वाहन सोडून पळून गेला होता. अक्षय पवार हा वेल्डिंगचं काम करतो. अपघात झालेला टेम्पो विजय खुरंगुळे यांच्या मालकीचा (Pune Accident News) आहे. त्यांनी चारचाकी टेम्पो दुरुस्तीसाठी अक्षय पवार यास दिला होता.

आता पोलीसांनी हा टेम्पो ताब्यात घेतला (Tempo Hit Child) आहे. बिबेवाडी पोलीस फरार झालेल्या अक्षय पवारचा शोध घेत आहेत. पुण्यातील बिबवेवाडीमध्ये ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला (Tempo Accident) आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT