Bharat Jadhav
वाढलेलं वजन कमी करणं हे एक मोठं आव्हान ठरत असतं. वजन करण्याच्या व्यायामातील पहिला प्रकार म्हणजे चालणे. शरीरातील कॅलरीज् जाळण्यसााठी चालणे हा बेस्ट पर्याय ठरत असतो.
नियमित चालण्यामुळे चयापचयाची (मेटाबॉलिझम) गती वाढण्यास मदत होते. शरीरातील चरबी कमी करण्याससह स्नायूंचा टोन सुधारण्यास मदत होत असते.
व्यक्तीचे वजन आणि चालण्याचा वेग यानुसार एका तासात साधारण २०० ते ४०० कॅलरी जळू शकतात.
१ किलो वजन कमी करायचं असेल तर सुमारे ७,७०० कॅलरीची तूट निर्माण करावी लागते.
एका आठवड्यात १ किलो वजन कमी करायचे असेल तर दररोज अंदाजे २२ हजार ते २७ हजार ५०० पावले चालावे लागतात.
आहारातून सुमारे ५०० कॅलरी कमी करण्याचा प्रयत्न करा. आहारातील बदलांमुळे दररोजच्या पावलांचे उद्दिष्ट १२ हजार ते १५ हजारांपर्यंत ठेवणे शक्य होऊ शकते.
दररोज १० हजार ते १२ हजार पावले चालण्याचे लक्ष्य ठेवून साधारण १० ते १५ दिवसांत १ किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो.
कॅलरीचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा आणि दिवसभरातील एकूण शारीरिक हालचाल वाढवा. अधिक कॅलरी जाळण्यासाठी वेगाने चालण्याचा सराव करा.