Bharat Jadhav
सकाळी उठल्याबरोबर अनेकांना चहा किंवा कॉफी लागते. ही अनेक लोकांची रोजची सवय आहे. कामावर थकवा जाणवत असतानाही, लोक अनेकदा एक कप कॉफी पितात.
कॉफीमध्ये कॅफीन असते, जे शरीराला अधिक सक्रिय ठेवण्यास आणि मनाला काही काळासाठी सतर्क ठेवण्यास मदत करते.
तुम्ही दिवसभर तुम्हाला हवी तितकी कॉफी पिऊ शकता. मात्र कॅफीनच्या अतिसेवनामुळे अस्वस्थता, झोपेत व्यत्यय आणि हृदयाचे ठोके वाढणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे किती कॉफी पिता याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
बहुतेक निरोगी प्रौढांसाठी दिवसातून एकूण 400 मिलीग्रॅमपर्यंत कॅफीनचे सेवन हे घातक असतं. हे प्रमाण अंदाजे 2 ते 4 कप इतके असते. परंतु कॉफीमधील कॅफीनचे प्रमाण तिच्या प्रकारावर आणि बनवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते.
कॅफीनच्या अतिसेवनामुळे काही लोकांना अस्वस्थता, हातांना कंप सुटणे, डोकेदुखी, पोटदुखी आणि हृदयाचे ठोके वाढणे यासारखे त्रास होऊ शकतात. याचा सर्वात सामान्य परिणाम झोपेवर होतो.
संध्याकाळी किंवा रात्री जास्त कॉफी प्यायल्याने झोप लागण्यास अडचण येऊ शकते. झोपेची गुणवत्ता बिघडू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला कॅफीन वेगवेगळ्या प्रकारे सहन होते. काही लोकांना फक्त एक किंवा दोन कप प्यायल्यानंतर अस्वस्थता जाणवत असते.
अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनेकॉलॉजिस्टच्या मते, गर्भधारणेदरम्यान दररोज 200 मिलीग्रामपेक्षा कमी कॅफीनचे सेवन करणे सुरक्षित मानले जाते.