Bharat Jadhav
वयानुसार चेहऱ्यावर बारीक रेषा, सुरकुत्या आणि कोरडेपणा दिसू लागतो. त्वचेतील नैसर्गिक कोलेजनच्या पातळीत घट झाल्यामुळे असे घडते.
बाजारात मिळणाऱ्या महागड्या 'अँटी-एजिंग' आणि कोलेजन क्रीम्समध्ये विविध रसायने असतात, ज्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. वाढत्या वयातही २५ वर्षांच्या तरुणाईसारखा लूक आणि नैसर्गिक तेज तुम्हाला हवा असेल, तर तुम्ही जवस (flaxseeds) आणि बदामाचे तेल वापरून घरीच १००टक्के नैसर्गिक कोलेजन क्रीम तयार करू शकता.
ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेली ही क्रीम त्वचेला खोलवर पोषण देते, ज्यामुळे त्वचेला बोटॉक्ससारखा घट्टपणा आणि काचेसारखी चमक प्राप्त होते.
जवसाच्या बिया - २ मोठे चमचे,पाणी - १ कप,बदामाचे तेल - १ मोठा चमचा ,कोरफडीचा गर (Aloe vera gel) - २ मोठे चमचे,व्हिटॅमिन ई कॅप्सूल - १, गुलाब पाणी - १ मोठा चमचा.
एका भांड्यात १ कप पाणी आणि २ मोठे चमचे जवस (flaxseeds) घ्या आणि मध्यम आचेवर ५-६ मिनिटे उकळा. पाण्याला फेस येऊ लागल्यावर आणि त्याचे घट्ट, चिकट जेल तयार झाल्यावर गॅस बंद करा.
मिश्रण गरम असतानाच, जवसाच्या बियांचे (flaxseeds) शुद्ध जेल मिळवण्यासाठी ते सुती कापडातून किंवा बारीक गाळणीतून गाळून घ्या आणि थंड होऊ द्या.
एका स्वच्छ काचेच्या बाऊलमध्ये २ मोठे चमचे तयार जवसाचे जेल आणि २ मोठे चमचे कोरफडीचे जेल घ्या.
आता यात १ मोठा चमचा बदामाचे तेल, १ मोठा चमचा गुलाबजल आणि एका 'व्हिटॅमिन ई' कॅप्सूलमधील तेल घाला.
पळी किंवा चमच्याच्या साहाय्याने हे संपूर्ण मिश्रण ३-४ मिनिटे सतत फेटा. हळूहळू या मिश्रणाला दुकानात मिळणाऱ्या उत्पादनासारखाच मऊ, पांढरा आणि क्रीमी पोत तयार होईल.
तयार केलेली कोलेजन क्रीम एका स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या डबीत काढून ठेवा आणि ती रेफ्रिजरेटरमध्ये साठवा. तुम्ही ही क्रीम १५ दिवसांपर्यंत सहजपणे वापरू शकता.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी, आपला चेहरा स्वच्छ धुवा आणि कोरडा करा. त्यानंतर, थोडीशी क्रीम घेऊन ती चेहरा आणि मानेवर खालून वरच्या दिशेने (अपवर्ड मोशनमध्ये) दोन मिनिटे मसाज करत लावा आणि रात्रभर तशीच राहू द्या.