Saturday Horoscope : कसलाही ताण घेऊ नये! पैशाची तंगी जाणवणार नाही, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Today Rashi Bhavisha : १२ राशींच्या व्यक्तींचा शनिवार कसा असणार? जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य.
Saturday Horoscope
Saturday HoroscopeSaam Tv
Published On: 

मेष : आर्थिक व्यवहार करताना नियमांचं पालन करा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. वाद टाळून जवळच्या व्यक्तींच्या मदतीने पुढे जा.

वृषभ : आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल राहू शकतो. कामातील ध्येय पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. सहकारी आणि मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल.

मिथुन : करिअर आणि व्यवसायात पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात. वरिष्ठ आणि अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन आकर्षक प्रस्तावही मिळण्याची शक्यता आहे.

कर्क : नशिबाची साथ मिळाल्याने कामांना वेग येईल. व्यावसायिक चर्चांमध्ये सकारात्मक घडामोडी होतील. व्यवसायात वाढ आणि अपेक्षित यश मिळू शकते.

सिंह : कोणताही करार करताना घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळाल्याने कामे पूर्ण होतील.

Saturday Horoscope
Ganesh Chaturthi 2027: पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येणार, तारिख आत्ताच लिहून घ्या

कन्या : महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी जवळच्या व्यक्तींची मदत मिळेल. दांपत्य जीवनात आनंदाचे वातावरण राहील. नेतृत्व क्षमता वाढेल आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल.

तुळ : आर्थिक बाबतीत परिस्थिती अपेक्षेप्रमाणे राहू शकते. कामाचा ताण स्वतःवर अधिक घेणे टाळा. अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने निर्णय घेणे फायदेशीर ठरेल.

वृश्चिक : मित्र आणि सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. कामकाजात प्रगती होऊन आर्थिक लाभ वाढू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.

Saturday Horoscope
October 2026 Rules : एलपीजी सिलेंडरपासून युपीआयपर्यंत, १ ऑक्टोबरपासून ५ मोठे नियम बदलणार; थेट तुमच्या बजेटवर होणार परिणाम

धनु : कुटुंबातील व्यक्तींशी वाद होणार नाही याची काळजी घ्या. इतरांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. करिअर आणि व्यवसायात यशाच्या चांगल्या संधी मिळू शकतात.

मकर : नवीन आणि धाडसी निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल राहू शकतो. कामाचा विस्तार करण्यावर भर द्याल. महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क वाढल्याने व्यवसायात फायदा होऊ शकतो.

कुंभ : कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित कराल. मान-सन्मान वाढण्यासोबत मित्रांचेही सहकार्य मिळेल.

मीन : कामात चांगले परिणाम मिळाल्याने उत्साह वाढेल. सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते. कला आणि कौशल्य दाखवण्याच्या नवीन संधी मिळतील.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com