Horoscope Rahu-Ketu : चांदीच चांदी होणार! नशीब पलटणार, या 3 राशींचं नशीब अचानक चमकणार

Rahu-Ketu Transit for 76 Days: राहु-केतूच्या नक्षत्र गोचरामुळे मेष, सिंह, वृश्चिक, कुंभ, कन्या आणि धनु राशींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये संधी आणि व्यवसायात प्रगतीचे योग असल्याचं ज्योतिषीय मत आहे.
Horoscope Rahu-Ketu
Horoscope Rahu-Ketu meta ai
Published On: 

तुमची पुढील राशींपैकी कोणतीही राशी असेल तर तुमच्यासाठी येणारा काळ सुखाचा असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात राहु आणि केतू यांना छाया ग्रह मानलं जातं. हे दोन्ही ग्रह नेहमी वक्री गतीने भ्रमण करतात. त्यामुळे त्यांच्या राशी किंवा नक्षत्रातील बदलाचा परिणाम दीर्घकाळ जाणवू शकतो, असं ज्योतिषशास्त्रात मानले जाते.

सध्या राहु मंगळाच्या स्वामित्त्वाच्या धनिष्ठा नक्षत्रात, तर केतू स्वत:च्या स्वामित्त्वाच्या मघा नक्षत्रात असल्याचं या ज्योतिषीय माहितीत नघा नक्षत्रात असल्याचं या ज्योतिषीय माहितीत नमूद करण्यात आलं आहे.

Horoscope Rahu-Ketu
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! पगार अन् पेन्शनचा नवा प्लॅन समोर, पाहा काय बदलणार?

ज्योतिषांच्या मते, राहु- केतूच्या या नक्षत्र गोचरामुळे काही राशींसाठी आर्थिक प्रगतीचे योग निर्माण होऊ शकतात. विशेषतः मेष, सिंह, वृश्चिक, कुंभ, कन्या आणि धनु या सहा राशींना या काळात फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

केतूच्या मघा नक्षत्रातील गोचरामुळे मेष राशीच्या व्यक्तींमध्ये निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास वाढू शकतो. सिंह राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन व्यवसायातील व्यवहारांना गती मिळू शकते. कुंभ राशीच्या व्यक्तींना भागीदारीच्या कामातून फायदा आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळण्याचे संकेत आहेत.

दरम्यान, राहुच्या धनिष्ठा नक्षत्रातील गोचरामुळे मेष राशीला नोकरीत प्रमोशन किंवा पगारवाढीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या व्यक्तींना जुन्या वादातून दिलासा मिळून व्यवसायात फायदा होण्याचे संकेत आहेत. तर धनु राशीच्या व्यक्तींना परदेशाशी संबंधित संधी किंवा आर्थिक लाभ मिळू शकतो.

Horoscope Rahu-Ketu
LPG Cylinder New Rule: ...तर LPG सिलेंडरची डिलिव्हरी बंद होणार? 1 ऑक्टोबरपासून नवा नियम

राहु-केतूचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी देवी दुर्गेची पूजा, गणपतीला दूर्वा अर्पण करणे, गरजू व्यक्तींना मदत करणे आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे उपाय सुचवले जातात.

टीप: ही माहिती ज्योतिषशास्त्रीय मान्यतांवर आधारित आहे. याला वैज्ञानिक आधार नसून याकडे केवळ मनोरंजन आणि माहितीसाठी पाहावे. साम टिव्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com