October 2026 Rules : एलपीजी सिलेंडरपासून युपीआयपर्यंत, १ ऑक्टोबरपासून ५ मोठे नियम बदलणार; थेट तुमच्या बजेटवर होणार परिणाम

LPG Subsidy : ऑक्टोबर महिन्यापासून LPG सबसिडीच्या नियमात मोठे बदल होणार आहेत. UPI व्यवहार, NRI प्रॉपर्टी TDS, आणि ESIC संबंधित महत्त्वाचे नियम बदलणार आहेत.
October 2026 Rules
October 2026 Rules meta ai
Published On: 

सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर २०२६ पासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारांशी संबंधित बऱ्याच नियमात बदल होणार आहेत. LPG सबसिडी, UPI पेमेंट, NRI कडून प्रॉपर्टी खरेदी, ESIC, दिल्लीतल्या महिलांचा बस प्रवास आणि बँकिंग व्यवस्थेशी संबंधित हे बदल महत्त्वाचे ठरणार आहेत.

LPG सब्सिडीसाठी आधार ऑथेंटिकेशन अनिवार्य

1 ऑक्टोबरपासून पात्र ग्राहकांना LPG सबसिडीचा लाभ घेण्यासाठी Biometric Aadhaar Authentication (BAA) पूर्ण करणं गरजेचं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातल्या जवळपास 89.9 टक्के सक्रिय घरगुती LPG ग्राहकांनी ही प्रोसेस पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही बंधित कंपनीच्या अॅपची मदत घेऊ शकता.

October 2026 Rules
Horoscope Rahu-Ketu : चांदीच चांदी होणार! नशीब पलटणार, या 3 राशींचं नशीब अचानक चमकणार

UPI पेमेंटवर MDR लागू होणार

15 ऑक्टोबरपासून निवडक 2,000 रुपयांपेक्षा जास्त P2M UPI व्यवहारांवर 0.4 टक्के MDR लागू करण्याची तरतूद आहे. मात्र, हा शुल्क थेट ग्राहकांकडून वसून करायला परवानगी नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. 75,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर शुल्काची कमाल मर्यादा ३०० रुपये असेल.

October 2026 Rules
Banana VS Orange : केळी आणि संत्रं एकत्र खाणं योग्य की अयोग्य?

NRI प्रॉपर्टी खरेदीची प्रक्रिया सोपी

1 ऑक्टोबरपासून NRI कडून अचल संपत्ती खरेदी करणाऱ्या निवासी व्यक्ती किंवा HUF साठी TDS प्रोसेसमध्ये बदल होणार आहे. PAN आधारित प्रक्रिया आणि Form 141 च्या वापरामुळे स्वतंत्र TAN घेण्यासंदर्भातले अनुपालन काही प्रमाणात सोपं होणार आहे. मात्र, NRI प्रॉपर्टीवरील TDSची जबाबदारी कायम राहणार आहे.

ESIC आणि दिल्लीतील बस प्रवासात बदल

मध्य प्रदेशातील 24 जिल्ह्यांमध्ये पात्र कर्मचारी आणि आस्थापनांसाठी ESIC कव्हरेजचा विस्तार होणार आहे. दुसरीकडे, दिल्लीत महिलांना आणि ट्रान्सजेंडर प्रवाशांना मोफत बस प्रवासासाठी Saheli Pink Smart Card आवश्यक होणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत पेपर पिंक तिकीट व्यवस्था राहणार असून, 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्डद्वारे मोफत प्रवास करता येईल.

ऑक्टोबरमध्ये बँक हडताळीची शक्यता

बँक कर्मचारी संघटनांनी पाच दिवसांच्या बँकिंगसोबत वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मागण्या मान्य न झाल्याने 26 ऑक्टोबर 2026 पासून अनिश्चितकालीन बँक हडताळीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com