Sakshi Sunil Jadhav
पुढील वर्षी गणेश चतुर्थी 4 सप्टेंबर 2027 रोजी साजरी होणार आहे.
यंदाच्या तुलनेत पुढील वर्षी गणेशोत्सवाचे आगमन तब्बल दहा दिवस आधी होणार आहे.
यंदा गणेश चतुर्थी 14 सप्टेंबर 2026 रोजी आली होती.
4 सप्टेंबरला गणेशमूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली जाणार आहे.
घरगुती गणपतींसोबतच सार्वजनिक गणेश मंडपांमध्येही उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे.
सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी विविध ठिकाणी कृत्रिम तलाव, विसर्जन घाट आणि मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केली जाणार आहे.
पंचांगानुसार गणेश चतुर्थीनंतर दीड, पाच, सात आणि दहा दिवसांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.
गणेश चतुर्थी 2028 मध्ये 23 ऑगस्ट, 2029 मध्ये 11 सप्टेंबर आणि 2030 मध्ये 1 सप्टेंबर रोजी येणार आहे.
गणेश चतुर्थीची तारीख दरवर्षी बदलत असल्याने गणेशोत्सव कधी लवकर तर कधी उशिरा येतो; यामागे पंचांगातील तिथींची गणना महत्त्वाची असते.