Nagpur Accident: भरधाव ट्रकने १२ वाहने चिरडली, दुचाकी अन् रूग्णवाहिकेचा चेंदामेंदा; मानकापूर परिसरात भीषण अपघात

Container Heat 12 Vehicle: नागपूरच्या मानकापूर परिसरात भरधाव ट्रकने 12 गाड्यांना धडक दिली आहे. अपघातग्रस्त कारमधील प्रवाशांना जबर मार लागला.
 Accident
Nagpur AccidentSaam Tv

पराग ढोबळे साम टीव्ही, नागपूर

Nagpur Accident News Update

नागपूरच्या मानकापूर परिसरात भरधाव ट्रकने 12 गाड्यांना धडक (Nagpur Accident) दिली आहे. यामध्ये 9 कार, एक रुग्णवाहिका आणि दोन दुचाकी वाहनांचा समावेश आहे. या अपघातात चारजण जखमी झाल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे. ट्रकने धडक दिल्यामुळे एक कार थेट दुसऱ्या कारवर चढल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मानकापूर चौकात झालेल्या भीषण अपघातात 12 ते 13 चार चाकी गाड्यांचं नुकसान झालं आहे. उड्डाण पुलावरून येणाऱ्या भरधाव ट्रकने सिग्नलवर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांना जोरदार दिली (Container Heat 12 Vehicle) धडक दिली. या धडकेत सुमारे पाच ते सहापेक्षा जास्त कारचं नुकसान झालं आहे. या अपघातानंतर घटनास्थळी बराचवेळ तणावाचं वातावरण होतं, अशी माहिती मिळतेय.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातग्रस्त कारमधील प्रवाशांना जबर मार लागला आहे. अपघातग्रस्त प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. धडक एवढी जबरदस्त होती की, एक कार दुसऱ्या कारवर चढल्यामुळे कारचा चेंदामेंदा झाला (Nagpur Accident News Update) आहे. अपघातमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी गर्दी झाली होती. वाहतुकीचाही बराच वेळा खोळंबा देखील झाला होता.

चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यामुळे तो समोर लाल सिग्नल असल्यामुळे थांबलेल्या वाहनांवर मागून धडकला. या कंटेनरनेअगोदर एका कारला धडक दिली. त्यानंतर काही कार अन् दुचाकी फरफटत (Accident News) गेल्या. यामध्ये एक दुचाकी कंटेनरखाली चिरडली गेली. या अपघातात रुग्णवाहिकेचाही चेंदामेंदा झाल्याचं समोर आलं आहे.

 Accident
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर मालवाहू ट्रक आणि बोलेरो पिकपचा भीषण अपघात; २ गंभीर जखमी

आतापर्यंत या अपघातात चारजण जखमी झाल्याची माहिती मिळत (Nagpur Accident News) आहेत. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तातडीने मानकापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत या घटनेत कुणाचाही मृत्यू झाल्याची माहिती (Accident In Mankapur Area) मिळालेली नाही.

 Accident
Accident News: मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; तर वाघोली ब्रिजवर कार दुचाकीच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com