Accident News: मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; तर वाघोली ब्रिजवर कार दुचाकीच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

Solapur Accident Teacher Death: मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघात ट्रक चालक आणि अन्य एक व्यक्ती जखमी झाला आहे. वाघोली ब्रिजवर कार दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
Accident News
Accident NewsSaam Tv

Car Bike Accident On Wagholi Bridge

मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात (Accident On Mumbai Ahmedabad Highway) झाला आहे. ठाण्यावरून अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक ट्रॉलीने मागून धडक दिली. या घटनेत मागून धडक देणाऱ्या ट्रकमधील व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर अलीबधाब्या जवळ हा अपघात घडला. (latest accident news)

सकाळी साडे सहाच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातानंतर काही ( Mumbai Ahmedabad Highway) काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर ही वाहतूक कोंडी कमी झाली. वाहतुकीसाठी रस्ता मोकळा झाला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाघोली ब्रिजवर कार दुचाकीचा भीषण अपघात

वाघोली ब्रिजवर कार दुचाकीचा भीषण अपघात झाला (Car Bike Accident On Wagholi Bridge) आहे. या अपघातामध्ये शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील कामती जवळील वाघोली ब्रिजवर हा कार दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातात एक शिक्षक गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालाय.

मोहोळ तालुक्यातील सोहाळेतील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हरी (Accident On Wagholi Bridge) जगताप, असं मृत्यू झालेल्या शिक्षकाचं नाव आहे. वाघोली ब्रिजवर झालेल्या अपघातात कारच्या पुढच्या बाजूचं नुकसान झालं आहे. तर, दुचाकीचंही मोठं नुकसान झालं आहे. याबाबत सोलापूर ग्रामीण पोलीस तपास करत (Solapur Accident) आहे.

Accident News
Jalgaon Accident : कारवरील नियंत्रण सुटून झाडावर आदळली; अपघातात चालकाचा मृत्यू, एकजण जखमी

नवले पुलाखाली तीन वाहनांचा अपघात

नवले पुलाखाली आज सकाळी तीन वाहनांचा अपघात (Pune Accident) झाल्याची घटना घडली होती. नवले पुलाखाली अपघाताचं सत्र सुरूच आहे. सकाळी नवले पुलाखाली तीन वाहने एकमेकांना धडकली. माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली (Bus Truck Accident)आहे. आता घटनास्थळी पोलीस तपास सुरू आहे. (latest accident news)

सकाळच्या सुमारास ट्रक, टँकर आणि खाजगी बसचा अपघात झाला होता. तीन वाहनं एकमेकांना धडकल्यामुळे काही वेळ वाहतूक देखील खोळंबली होती. वाहतुक पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर ही वाहनं बाजूला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक देखील सुरळीत करण्यात आली आहे. या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. अपघात कशामुळे झाला, याचं नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही.

Accident News
Dindori Road Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव जीप झाडाला आदळली; ५ ते ६ जण दगावल्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com