Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर मालवाहू ट्रक आणि बोलेरो पिकपचा भीषण अपघात; २ गंभीर जखमी

Accident On Samruddhi Highway: आज वाशिम जिल्ह्यात ट्रक आणि बोलेरो पिकअपचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झालेले आहेत.
Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg AccidentSaam Tv

मनोज जयस्वाल साम टीव्ही, वाशिम

Accident On Samruddhi Highway In Washim

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका चालूच आहे. आज वाशिम जिल्ह्यात ट्रक आणि बोलेरो पिकअपचा अपघात झाला आहे. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले (Accident On Samruddhi Highway) आहेत. वाशीमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेंदूरजना मोरे येथील ओव्हरब्रिजजवळ तीन वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झालेले आहेत. (Latest Marathi News)

या अपघातात वाहनातील द्राक्ष आणि कांदे महामार्गावर पडले (आहेत. बोलेरो पिक गाडीचे आणि त्यामधील मालाचे (Samruddhi Highway In Washim) मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. लासलगावहुन नागपूरकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक सकाळी पलटी झाला. पलटी झालेला ट्रक ओव्हर ब्रिजसमोर होता. त्यामुळे मागुन येत असलेल्या ट्रकने अचानक ब्रेक (Washim News) दाबले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामागून येणाऱ्या भरधाव वेगाने नाशिकहुन नागपूरकडे द्राक्षे घेऊन जाणारी बोलेरो पिक गाडीने अचानक थांबलेल्या समोरील ट्रकला मागुन जोरदार धडक दिली. त्यामुळे तीन वाहनांचा अपघात (Samruddhi Mahamarg Accident) झाला. अपघातामधील सर्व द्राक्ष आणि कांदे रस्त्यावर पडले. द्राक्ष वाहतूक करणाऱ्या गाडीतील चालक आणि वाहक घनश्याम पटेल तसंच राजा अहिरवल गंभीररीत्या जखमी झाले आहे.

कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील चालकालाही किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) रेस्क्यू टीम आणि पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिकेच्या साहाय्याने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात केलं आहे.

Samruddhi Mahamarg Accident
Accident News: मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; तर वाघोली ब्रिजवर कार दुचाकीच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

समृद्धी महामार्ग अपघातांमुळे जास्त चर्चेत (Accident News) आहे. या महामार्गावर अपघाताचं सत्र सुरूच असल्याचं दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कंटेनरला कारने जोरदार धडक दिल्याची घटना आज सकाळी घडली.

Samruddhi Mahamarg Accident
Beed Accident CCTV Footage: ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक; नमाज पठण करून येणाऱ्या तरूणाचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com