

दिलीप कांबळे, साम प्रतिनिधी
मावळच्या आंबळे एमआयडीसीतील आंबळे परिसरात कथित बेकायदेशीर उत्खननाचा मुद्दा तापलाय. भू-माता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज थेट मावळ तहसील कार्यालयावर धडक देत बोंबाबोंब आंदोलन केलंय. वनीकरणाच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केलाय. विशेष म्हणजे, अडीचशे ते तीनशे फूट खोल खोदकाम झाल्याचा दावा करण्यात आलाय.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून सुरू असलेल्या या कथित उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोपही करण्यात आलाय. इतकंच नाही, तर जमिनीच्या नोंदी आणि वनीकरणाच्या दाखल्यांबाबत शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केलाय. या कथित उत्खननातून शासनाचा बुडालेला महसूल दंडासह वसूल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, उत्खनन करणाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा गंभीर आरोपही आंदोलकांनी केलाय. त्यामुळे कथित खनन माफियांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीय. आता या गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेतं? कथित उत्खननाची चौकशी कधी होते? आणि शासनाचा बुडालेला महसूल वसूल होतो का? याकडे मावळकरांचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.