PM Narendra Modi  Saam Tv
मुंबई/पुणे

PM Modi In Maharashtra: विधानसभेनंतर PM मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्रात, महायुतीच्या आमदारांना देणार कानमंत्र

Prime Minister Modi’s Navi Mumbai Visit: विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील विक्रमी विजयानंतर पीएम मोदी कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Priya More

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. नौसेनेच्या दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. तसेच आमदारांसोबत स्नेहभोजन देखील करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील विक्रमी विजयानंतर पीएम मोदी कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. पीएम मोदी महायुतीच्या आमदारांना काय कानमंत्र देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शहांनी कालच पंचायत ते संसद नाऱ्यानंतर पीएम मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पीएम मोदी १५ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे तीन प्रमुख नौदल युद्धनौका INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर यांचे लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करतील. या दौऱ्यादरम्यानच ते महायुतीच्या आमदारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

नवी मुंबईतील खारघर येथे श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन पीएम मोदी करणार आहेत. ९ एकरमध्ये पसरलेल्या या प्रोजेक्टमध्ये अनेक देवी- देवतांचे मंदिर, वैदिक शिक्षण केंद्र, प्रस्तावित संग्रहालय आणि सभागृह आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे. वैदिक शिकवणींद्वारे वैश्विक बंधुता, शांतता आणि सौहार्दाला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आयुष्यात 'या' लोकांशी शत्रुत्व महागात पडेल, कारण...

Priya Marathe: लाडक्या मैत्रीणीला शेवटाचा निरोप; अभिनेत्री प्रार्थना बेहेरेला अश्रू अनावर, हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIDEO

Padwal Curry Recipe : गावाकडे बनवतात तशी झणझणीत पडवळ करी, वाचा पारंपरिक रेसिपी

Pandharpur Temple: विठ्ठल मंदिरातील लाडू प्रसादाला बुरशी; पाकिटातून निघाल्या आळ्या

पोलीस इन्स्पेक्टरचा टोकाचा निर्णय; राहत्या खोलीत आयुष्य संपवलं; कुटुंबियांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT